how to get rid of pigmentation, simple home remedies to reduce pigmentation
फक्त ५ रुपयांत चेहऱ्यावरचे वांगाचे डाग निघून जातील, १ साेपा उपाय- त्वचा दिसेल स्वच्छ, चमकदारPublished:November 17, 2024 09:17 AM2024-11-17T09:17:12+5:302024-11-17T09:20:01+5:30Join usJoin usNext साधारण तिशीनंतर बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग दिसू लागतात. नाकाच्या जवळचा गालाचा भाग, हनुवटी, कपाळ या ठिकाणी पिगमेंटेशन जरा जास्तच जाणवते. हे डाग काढून टाकण्यासाठी आता हा एक सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय बघा. हा उपाय fashionwithfahad या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. वांगाचे डाग काढून टाकण्यासाठी आपल्याला तुरटीची मदत घ्यायची आहे. सगळ्यात आधी तर तुरटी फोडून तिची छान पावडर करून घ्या. त्यानंतर एखाद्या गाळणीने ही पावडर गाळून घ्या. अर्धा चमचा तुरटीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल टाका. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि त्याने चेहऱ्याला ५ मिनिटे हळुवार हाताने मसाज करा. यानंतर दोन मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरील वांगाचे डाग पुर्णपणे निघून जातील. टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीBeauty TipsSkin Care TipsHome remedy