1 / 5टीनएजर्सला पिंपल्स येण्याचा त्रास नेहमीच होतो. कधी कधी चेहऱ्यावर एकदम पिंपल्स येणं सुरू होतं आणि मग सातत्याने ते पुढचे काही दिवस येत असतात.2 / 5यामुळे मग चेहरा पुर्णपणे खराब होतो. कधी कधी पोट खराब असेल, हार्मोन्समध्ये काही बदल झाले असतील तरीही कोणत्याही वयात पिंपल्स येण्याचा त्रास होतोच.. 3 / 5हा त्रास जर तुम्हाला सातत्याने होत असेल तर काय उपाय करायला पाहिजे याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी merishrushti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.4 / 5यामध्ये त्या सांगतात की जर चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर त्यापुढचे काही दिवस दही खाणं पुर्णपणे टाळा. याचा अर्थ दही आरोग्यासाठी चांगलं नाही, असा मुळीच नाही. पण तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच हार्मोन्सचे बिघडलेले संतुलन पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी काही दिवस दही खाणं टाळलं पाहिजे.5 / 5चेहऱ्यावरचे पिंपल्स येणं पुर्णपणे बरं झालं आणि आता नवा कोणताही पिंपल येत नाहीये याची खात्री पटल्यावर पुन्हा दही खाण्यास सुरुवात करू शकता, असंही त्यांनी सांगितलं.