how to give glossy look to your regular mat shade or nude shade lipstick
बघा मॅट लिपस्टिकला कसा द्यायचा ग्लॉसी लूक! सणासुदीला कामी येणारी भन्नाट ट्रिक- लगेच पाहाPublished:September 5, 2024 11:36 AM2024-09-05T11:36:10+5:302024-09-05T11:41:55+5:30Join usJoin usNext गौरी- गणपतीचा सण आता सुरूच होणार आहे. त्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी असे एकानंतर एक सण आहेतच. या सणांसाठी आपण दरवेळी वेगवेगळ्या पद्धतीने छान तयार होतो. अशावेळी अगदी न विसरता बहुतांश महिला लिपस्टिक लावतातच. एरवी मॅट लूक असणाऱ्या लिपस्टिक आपण वापरत असलो तरी सणासुदीला मात्र ग्लॉसी लूक देणाऱ्या लिपस्टिक छान वाटतात, उठून दिसतात. आता तुमच्याकडे ग्लॉसी लूक देणारी किंवा ग्लाॅसी फिनिशची लिपस्टिक नसेल तर तुमच्याकडच्याच मॅट लिपस्टिकला किंवा न्यूड शेड लिपस्टिकला ग्लॉसी शेडमध्ये कसं बदलायचं, याची एक भन्नाट ट्रिक अभिनेत्री लता सब्रवाल यांनी इस्टाग्रामवर शेअर केली आहे. (how to give glossy look to your regular mat shade or nude shade lipstick) त्या सांगतात की सगळ्यात आधी तुमच्याकडची मॅट फिनिशिंगची किंवा न्यू शेड लिपस्टिक ओठांवर लावून घ्या. त्यानंतर आयशाडो पॅलेट घ्या आणि तुम्हाला जो शेड हवा असेल तो ग्लॉसी शेड ब्रशच्या साहाय्याने किंवा बोटाच्या टोकाने तुमच्या लिपस्टिकवर हलकासा लावा.. यानंतर तुम्ही लिपबामचा पातळ शेडही ओठांवर लावू शकता. ही लिपस्टिक जास्त काळ टिकते आणि आयशॅडोच्या मदतीने तुम्हाला पाहिजे ती शेड तुम्ही तयार करू शकता. एकदा हा सोपा प्रयोग करून पाहायला हरकत नाही..टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सगणेश चतुर्थी २०२४गणेशोत्सवBeauty TipsMakeup TipsGanpati FestivalGanesh Mahotsav