बघा मॅट लिपस्टिकला कसा द्यायचा ग्लॉसी लूक! सणासुदीला कामी येणारी भन्नाट ट्रिक- लगेच पाहा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2024 11:36 AM 1 / 6गौरी- गणपतीचा सण आता सुरूच होणार आहे. त्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी असे एकानंतर एक सण आहेतच. या सणांसाठी आपण दरवेळी वेगवेगळ्या पद्धतीने छान तयार होतो. 2 / 6अशावेळी अगदी न विसरता बहुतांश महिला लिपस्टिक लावतातच. एरवी मॅट लूक असणाऱ्या लिपस्टिक आपण वापरत असलो तरी सणासुदीला मात्र ग्लॉसी लूक देणाऱ्या लिपस्टिक छान वाटतात, उठून दिसतात.3 / 6आता तुमच्याकडे ग्लॉसी लूक देणारी किंवा ग्लाॅसी फिनिशची लिपस्टिक नसेल तर तुमच्याकडच्याच मॅट लिपस्टिकला किंवा न्यूड शेड लिपस्टिकला ग्लॉसी शेडमध्ये कसं बदलायचं, याची एक भन्नाट ट्रिक अभिनेत्री लता सब्रवाल यांनी इस्टाग्रामवर शेअर केली आहे. (how to give glossy look to your regular mat shade or nude shade lipstick)4 / 6त्या सांगतात की सगळ्यात आधी तुमच्याकडची मॅट फिनिशिंगची किंवा न्यू शेड लिपस्टिक ओठांवर लावून घ्या. 5 / 6त्यानंतर आयशाडो पॅलेट घ्या आणि तुम्हाला जो शेड हवा असेल तो ग्लॉसी शेड ब्रशच्या साहाय्याने किंवा बोटाच्या टोकाने तुमच्या लिपस्टिकवर हलकासा लावा.. 6 / 6यानंतर तुम्ही लिपबामचा पातळ शेडही ओठांवर लावू शकता. ही लिपस्टिक जास्त काळ टिकते आणि आयशॅडोच्या मदतीने तुम्हाला पाहिजे ती शेड तुम्ही तयार करू शकता. एकदा हा सोपा प्रयोग करून पाहायला हरकत नाही.. आणखी वाचा Subscribe to Notifications