Join us

उन्हाळ्यांत त्वचेला 'थंडा थंडा कुल कुल' ठेवण्यासाठी 'हे' ६ पदार्थ म्हणजे जादूच, टॅनिंग - सनबर्न राहील दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2025 12:49 IST

1 / 8
उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूंत त्वचेची (How to Keep Your Skin Hydrated and Non-sticky During Summer) विशेष काळजी घ्यावी लागते. तीव्र सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो . उन्हाळ्यांत सनबर्न आणि स्किन टॅनिंग सारख्या समस्या फार मोठ्या प्रमाणांत सतावतात.
2 / 8
विशेषतः उन्हाळ्यात त्वचेवरील नैसर्गिक ओलावा (How to Keep Skin Cool During Heatwave) नाहीसा होतो. उन्हाळ्यांत वातावरणातील उष्णता, तीव्र सूर्यप्रकाश, घाम आणि धूळ यामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव होऊ शकते. अशा परिस्थितीत, त्वचेला थंडावा मिळण्यासाठी काही नैसर्गिक पदार्थांचा आपण वापर करू शकतो.
3 / 8
जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर त्वचेच्या थंडाव्यासाठी तुम्ही कोरफड वापरु शकता. कोरफड वापरल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येईल. एलोवेरा जेल वापरल्याने तुम्हाला उन्हाच्या जळजळी पासूनही आराम मिळेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल त्वचेवर लावून हलक्या हाताने मालिश करा. यामुळे त्वेचेतील ओलावा टिकून चेहरा हायड्रेट राहील.
4 / 8
उन्हाळ्यात काकडी खाण्यासोबतच त्वचेला थंडावा मिळवून देण्यासाठी देखील तितकीच फायदेशीर असते. यासाठी हिरव्यागार काकडीचे मध्यम आकाराचे काप करा आणि ते थेट चेहऱ्यावर ठेवा आणि १० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही काकडीचा रस देखील त्वचेवर लावू शकता. यासाठी, काकडीचा रस काढून घ्या आणि तो कापसाच्या बोळ्याच्या मदतीने त्वचेवर लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळून त्वचा चमकदार आणि तजेलदार होईल.
5 / 8
उन्हाळ्यात बहुतेक भारतीय घरांमध्ये दही आवर्जून खाल्ले जाते. दही खाण्यासोबतच त्वचेला थंडावा मिळवून देण्यासाठी देखील दही फायदेशीर ठरते. यासाठी घरी तयार केलेले ताजे दही घेऊन ते बोटांच्या मदतीने त्वचेवर लावा. तुम्हाला हवे असल्यास, दही, हळद आणि मध मिसळून फेसपॅक देखील तयार करु शकता. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावा. यामुळे उन्हाने करपलेली, काळवंडलेली त्वचा थंड आणि शांत होण्यास मदत मिळेल तसेच त्वचेचा रंग देखील उजळून निघेल.
6 / 8
उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे गुलाबपाणी. गुलाबपाणी आपण दररोज आपल्या त्वचेला लावू शकता. उन्हाळ्यात सतत काही ठराविक तासांनी त्वचेवर गुलाबपाणी स्प्रे केल्याने त्वचा हायड्रेट होईल. याचबरोबर, उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे फेसपॅक त्वचेवर लावताना त्यात गुलाबपाणी मिसळून लावावे यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
7 / 8
बटाटा तुम्हाला सनबर्न आणि स्किन टॅनिंग पासून वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. बटाट्यामध्ये असलेले स्‍टार्चचे घटक सनबर्न झाल्यास त्वचा पुन्हा पूर्ववत करण्यास मदत करतात. तुम्ही सनबर्न झालेल्या ठिकाणी बटाट्याचे काप लावू शकता. यासोबतच, फ्रिजमधून थंड बटाटा घेऊन त्याला किसणीने बारीक किसा आणि मग सनबर्न झालेल्या ठिकाणी लावा.
8 / 8
टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस वापरून तुम्ही त्वचेला थंडावा मिळवून देऊ शकता. टोमॅटो मध्ये असणारे 'क' जीवनसत्व आणि लाइकोपिन त्वचेला हाइड्रेट करतात. टोमॅटो हा अँटीऑक्‍सीडेंटने युक्त असल्याने त्वचेला सूर्यप्रकाशातील युव्ही किरणांपासून वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावतो.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशलहोम रेमेडी