Join us
Daily Top 2 Weekly Top 5

साडी नेसून कमाल सुंदर दिसायचंय, फॉलो करा आलिया भटचे हे ७ साडी ट्रेण्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 16:57 IST

1 / 8
१. साडी नेसून कुल आणि कम्फर्टेबल रहायचंच पण शिवाय तुमच्या वागण्या- बोलण्यात आणि एकंदरीतच साडी कॅरी करण्यात एक स्टाईल स्टेटमेंट कसं आणायचं, हे बघायचं असेल तर आलिया भटचे साडीतले काही स्टनिंग लूक्स एकदा बघायलाच हवेत.
2 / 8
२. पांढऱ्या फ्लोरल प्रिंट साडीतला हा आलियाच लूक बघा. साडी पण अतिशय सिंपल आहे. त्यावर तिने फक्त मोठे झुमके आणि अंगठी एवढ्याच ॲक्सेसरीज घातल्या आहेत. पण साडीचा बंद गळ्याचा ब्लाऊज आणि परफेक्ट सूट होणाऱ्या ॲक्सेसरीज यामुळे ती कमाल दिसते आहे.
3 / 8
३. लाल रंगाच्या या साडीतला तिचा लूक चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्येही सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतो तो तिचा साधेपणा. डार्क रंगाच्या साडीवर सिंपल- सोबर मेकअप असावा, हे यातून लक्षात येतं.
4 / 8
४. गडद रंगाच्या साडीतला तिचा हा आणखी एक लूक. बऱ्याचदा साडीचा रंग गडद असेल तर त्यावरचा मेकअप आणि दागदागिने यांचं कॉम्बिनेशन खूप सांभाळून करावं लागतं. या डार्क रॉयल ब्लू साडीवर आलियाने ब्लू रंगाच्या ॲक्सेसरीज निवडलेल्या नाहीत. तर त्यावर कॉन्ट्रास्ट जाणारा फिका गुलाबी रंग तिने निवडला आहे.
5 / 8
५. हा आलियाचा आणखी एक ट्रेण्डी लूक.. पांढऱ्या सिक्विन साडीवर केलेला ग्लॉसी मेकअप आणि थोडीशी गडद रंगाची लिपस्टिक यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच चार्म आला आहे. यामध्येही तिचे कानातले बघण्यासारखे आहेत. आलिया साडीवर परफेक्ट मॅच कानातले घालत नाही, तर त्यात काहीतरी कॉन्ट्रास्ट रंग आणण्याचा तिचा प्रयत्न असतो, हे यातून दिसून येतं.
6 / 8
६. सिल्कची साडी नेसल्यावर अनेकदा हेअरस्टाईल, ॲक्सेसरीज कशा असाव्या, हे समजत नाही. अशावेळी आलियाच्या या लूकचा विचार करता येईल.
7 / 8
७. साडीवर शक्य तेवढा लाईट मेकअप ठेवणं ही आलियाची खासियत. डिझायनर साडीतला तिचा हा लूक त्यामुळेच तर अधिक आकर्षक दिसतो आहे.
8 / 8
८. साडी नेसल्यानंतर इतर कोणत्याही ॲक्सेसरीजपेक्षा आलिया सगळ्यात जास्त फोकस कानातल्यांवर करते, असं एकंदरीतच तिच्या बऱ्याच साडी लूक्सवरून दिसून येतं.
टॅग्स : ब्यूटी टिप्सआलिया भट