Join us   

चेहऱ्याचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढेल! फक्त चमचाभर तूप घेऊन 'हा' उपाय करा, पिंपल्स- ॲक्ने गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2024 6:34 PM

1 / 6
चेहऱ्यावर पिंपल्स, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन, ॲक्ने असं काहीही असेल तर काही दिवसांतच ते सगळं कमी होऊन जाईल आणि चेहऱ्यावर छान तेज येईल..(how to get rid of pigmentation, dark spots, acne and pimples)
2 / 6
यासाठी फक्त चमचाभर तूप घेऊन हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय dr.shilpaarora या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तूपाचा आणि इतर काही पदार्थांचा वापर करून घरच्याघरी त्वचेसाठी अतिशय पोषक असणारं क्रिम कसं तयार करायचं, याविषयीची माहिती देण्यात आली आहे. (ayurvedic method of making cream for face using ghee)
3 / 6
काही जणांच्या मते हा एक जुना आयुर्वेदिक उपाय असून त्याला शतध्रुत किंवा शतध्रत असं म्हणतात. हा उपाय करण्यासाठी एका वाटीत २ चमचे गुलाब पाणी घ्या. (best home remedies for glowing skin)
4 / 6
त्या पाण्यात अर्ध्या तासासाठी केशराच्या १० ते १५ काड्या भिजत घाला.
5 / 6
यानंतर एका पसरट ताटलीमध्ये १ चमचा तूप टाका. त्यामध्ये केशराच्या काड्या घातलेलं गुलाब पाणी टाका. आता एक वाटी घ्या आणि या मिश्रणावर त्या वाटीचा खालचा भाग २५ ते ३० वेळा गोलाकार पद्धतीने फिरवा.
6 / 6
काही वेळातच त्याला एखाद्या क्रिमसारखं टेक्स्चर येईल. हे क्रिम आता एखाद्या एअरटाईट डबीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. रोज रात्री झोपण्यापुर्वी ते चेहऱ्याला लावा. काही दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावर खूप छान चमक आलेली दिसेल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी