Join us

पांढरे केसही होतील काळे!! पाण्यात ३ पदार्थ घालून केसांना लावा- पांढऱ्या केसांचे टेन्शन विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2025 12:22 IST

1 / 7
कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या खूप वाढली आहे. म्हणूनच आता हा एक सोपा उपाय करून पाहा..
2 / 7
हा उपाय केल्यामुळे तुमचे केस नैसर्गिकपणे काळे होतील. अकाली केस पांढरे होण्याचं प्रमाण बरंच कमी होईल.
3 / 7
त्यासाठी नेमकं काय करायचं याविषयीची माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांनी dr.firoz786 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की एका भांड्यात २ ग्लास पाणी घ्या.
4 / 7
त्या पाण्यामध्ये १०० ग्रॅम अमलतास घाला. अमलतास तुम्हाला तुमच्या शहरातील आयुर्वेदिक दुकानात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरसुद्धा मिळू शकेल.
5 / 7
त्या पाण्यातच २ चमचे मेथ्या आणि २ चमचे कलौंजी घाला. भांड्यावर झाकण ठेवून द्या आणि रात्रभर हे पदार्थ पाण्यामध्ये भिजू द्या.
6 / 7
दुसऱ्यादिवशी सकाळी पाण्यात भिजून मऊ झालेले अमलतास थोडे ठेचून घ्या आणि हे पाणी गाळून घ्या. आता हे पाणी रोज रात्री झोपताना तुमच्या केसांना लावा.
7 / 7
दर तीन दिवसांनी शाम्पू करून केस धुवून टाका. हा उपाय ३ महिने नियमितपणे केल्यास केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण बरंच कमी होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी