Join us   

How to make herbal shampoo at home : केस खूप गळतात, वाढ थांबली? फक्त १० रुपयांत घरीच शॅम्पू बनवा, राखा केसांची निगा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 4:01 PM

1 / 7
बाजारात अनेक केसांसाठी वेगवेगळे शॅम्पू उपलब्ध असतात. या महागड्या प्रोडक्ट्समधील रसायनांमुळे अनेकदा साईड इफेक्ट्स जाणवू शकतात आणि केसांमधले मॉईश्चर कमी होते.
2 / 7
केस गळणं, कोंडा होणं कोरडी त्वचा, पांढरे केस अशा समस्या जाणवतात. तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील तर घरच्याघरी १० रूपयात शॅम्पू तयार करून तुम्ही मऊ, मुलायम केस मिळवू शकता.
3 / 7
घरी हर्बल शॅम्पू बनवण्याआधी, आपल्याला काही घटक आवश्यक आहेत. ज्यामध्ये शिककाई, रीठा पावडर, कडुलिंब पावडर, आवळा पावडर लागेल. या हर्बल शॅम्पूमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. घरगुती हर्बल शॅम्पू तुमच्या टाळूची पीएच पातळी संतुलित ठेवण्यास उपयुक्त ठरेल.
4 / 7
सर्व प्रथम एका पातेल्यात एक ग्लास पाणी टाकून गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा. पाणी कोमट होताच शिकाकाई, रेठा पावडर, कडुलिंब पावडर, आवळा पावडर घाला. सर्व पावडर कोमट पाण्यात मिसळा आणि चांगले फेटून घ्या. चांगले फेटल्यानंतर, 10 मिनिटे उकळण्यासाठी सोडा.
5 / 7
जेव्हा हे द्रावण चांगले उकळेल तेव्हा ते थंड होण्यासाठी काही वेळ सोडा आणि नंतर स्वच्छ बाटलीत साठवा. जर तुम्हाला शॅम्पूमध्ये छान सुगंध हवा असेल तर तुम्ही त्यात इसेंशियल तेल घालू शकता. या शॅम्पूचे फायदे तुम्हाला दोन वॉशमध्ये दिसतील.
6 / 7
शॅम्पू वापरण्यापूर्वी आपले केस पूर्णपणे ओले करा. ओल्या केसांवर शॅम्पू लावा आणि नंतर स्कॅल्पला हलक्या हातांनी मसाज करा. ज्यामुळे रक्ताभिसरण योग्य होईल.
7 / 7
हा हर्बल शॅम्पू आहे. त्यामुळे त्यात फेस येणार नाही. पण हा शॅम्पू बाजारातील शॅम्पूपेक्षा जास्त प्रभावा टाकेल. शॅम्पू लावल्यानंतर केस चांगले धुवा.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजी