how to make kajal at home, old and traditional method of making kajal at home
पाहा घरच्याघरी काजळ बनविण्याची वर्षांनुवर्षे जुनी पद्धत- डोळ्यांना थंडावा मिळून टपोरे- सुंदर दिसतीलPublished:November 16, 2024 09:34 AM2024-11-16T09:34:38+5:302024-11-16T09:35:01+5:30Join usJoin usNext डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्यासाठी आपल्याकडे अगदी जुन्या काळापासून काजळ लावण्याची प्रथा आहे. डोळ्यांचे सौंदर्य खुलविणे हाच काजळ लावण्याचा एकमेव हेतू नाही. कारण आयुर्वेदिक पद्धतीने जे औषधी काजळ तयार केले जाते, ते डोळ्यांसाठी आरोग्यदायीही ठरते. हल्ली बऱ्याच जणी ब्रँडेड काजळ विकत घेतात. त्याची किंमतही खूप जास्त असते. असे विकतचे काजळ घेण्यापेक्षा घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने काजळ तयार करता येतं. ते कसं करायचं याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे हे काजळ तयार करण्यासाठी आपल्याला ५ ग्रॅम बदाम, २ ग्रॅम भिमसेनी कापूर आणि ५ ग्रॅम त्रिफळा पावडर लागणार आहे. त्यासाठी कापसाचा एक उभट तुकडा घ्या. त्यामध्ये वरील सगळे पदार्थ भरा आणि त्याची वात तयार करा. ही वात एका पणतीमध्ये किंवा दिव्यामध्ये ठेवा आणि त्यात साजूक तूप घाला. यानंतर हा दिवा लावा. त्या दिव्यावर एक ताटली किंवा लोखंडाचे भांडे घेऊन काजळी धरा. काजळी जमा झाल्यानंतर एखादी टोकदार वस्तू घेऊन भांड्यावर जमा झालेली काजळी एखाद्या डबीत काढा. त्यात अगदी थेंबभर तूप घातले की छान काजळ झाले तयार. टॅग्स :ब्यूटी टिप्सडोळ्यांची निगाहोम रेमेडीघरगुती उपायBeauty Tipseye care tipsHome remedyAyurvedic Home Remedies