थंडीने बाटलीतील तेल गोठलं? सोप्या झटपट ५ टिप्स, तेल गरम न करताही होईल पातळ-प्रवाही...
Updated:January 17, 2025 16:08 IST2025-01-17T15:55:56+5:302025-01-17T16:08:40+5:30
How To Prevent Coconut Oil Getting Freeze In Winter Use These Tricks To Melt : How To Melt Coconut Oil In Less Then A Minute : How to Melt Coconut Oil in Winter : How to stop coconut oil from freezing during winters : तेल गोठलं की ते सहजपणे वापरता येत नाही, त्यासाठीच गोठलेलं तेल द्रव रुपात आणण्यासाठीचे उपाय...

हिवाळयात तेलाच्या बाटलीतील तेल वातावरणातील गारठ्याने (How To Prevent Coconut Oil Getting Freeze In Winter Use These Tricks To Melt ) गोठते. असे गोठलेले तेल वापरणे शक्य होत नाही. अशावेळी बाटलीतील तेल वापरता यावे यासाठी हे तेल ( How to Melt Coconut Oil in Winter) आपण वितळून त्याचे द्रव रुपात रुपांतर करून मगच वापरतो. गोठलेलं तेल वितळवण्यासाठी आपण अनेक उपायांचा वापर करतो.
काहीवेळा आपण हे तेल एका बाऊलमध्ये घेऊन थेट गॅसच्या ( How To Melt Coconut Oil In Less Then A Minute) आचेवर ठेवून गरम करतो. परंतु या उपायाने तेल लगेच गरम होऊन वितळते खरे पण काहीवेळा ते करपते. असे तेल करपून मग त्याला करपल्याचा वास येतो. असे होऊ नये यासाठी, हिवाळ्यात गोठलेलं तेल पुन्हा पहिल्यासारखे द्रव रुपात आणण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात.
१. जरा थंडी पडली की हिवाळ्यात खोबरेल तेल लगेच गोठते. अशा स्थितीत जर तुम्ही हिवाळ्यात खोबरेल तेल वापरत असाल तर ते पाण्यात ठेवून वितळवू घेऊ शकता. गरम पाण्यात खोबरेल तेलाची बाटली ठेवा. यामुळे बाटलीमध्ये जमा झालेले तेल सहज वितळेल. भांड्यातील गरम पाण्याची उष्णता आणि वाफेमुळे गोठलेले तेल वितळून पुन्हा पाहिल्यासारखे लिक्विड रुपात येते.
२. गोठलेले खोबरेल तेल वितळण्याचा अजून एक सोपा मार्ग म्हणजे हेअर ड्रायर वापरणे. जर तुमच्याकडे हेअर ड्रायर असेल तर खोबरेल तेलाच्या बाटलीच्या तोंडाशी ड्रायरमधली गरम हवा सोडा. यामुळे फारशी मेहेनत न घेताही तेल अगदी सहजपणे वितळेल.
३. कोरफड जेल किंवा इतर कोणतेही नॉन-फ्रीझिंग तेल खोबरेल तेलात मिसळा. यामुळे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय संपूर्ण हिवाळ्यात खोबरेल तेल वापरू शकता. हा उपाय खोबरेल तेल घट्ट होण्यापासून प्रतिबंधित करते.
४. कोरफड जेलशिवाय आपण बदाम, तीळ किंवा आवळ्याच्या तेलाचा देखील वापर करू शकता. वितळवून घेतलेल्या खोबरेल तेलामध्ये इतर कोणतेही तेल मिसळल्यास त्या तेलातील पोषक तत्व व काही घटक खोबरेल तेलामध्ये उतरतात व यामुळेच खोबरेल तेल वारंवार गोठत नाही. वारंवार गोठणाऱ्या खोबरेल तेलाला हा सोपा उपाय करून सारखेच गोठणारे खोबरेल तेल पुन्हा पाहिल्यासारखे करु शकता.
५. गोठलेलं तेल थोड्या थोड्या प्रमाणांत हातांवर घेऊन हलकेच दोन्ही हातांनी चोळून घ्या. या ट्रिकमुळे तेल अगदी सहजपणे वितळू लागते. तेल हातावर चोळल्याने दोन्ही हातांच्या उष्णतेमुळे तेल हळूहळू वितळू लागते.
६. गोठलेले तेल एका बाऊलमध्ये काढून ते गॅसवर किंचित गरम करून संपूर्णपणे वितळवून घ्यावे. गॅसची फ्लेम मंदच ठेवा नाहीतर तेल करपण्याची शक्यता असते.
७. गोठलेल्या खोबरेल तेलाची बाटली एका मोठ्या बाऊलमध्ये ठेवून त्यावर गरम पाणी ओतावे. गोठलेलं तेल अगदी सहजपणे वितळू लागेल.