तुमच्या ७ हेअरस्टाइलच ठरतात केस गळण्याचं मोठं कारण! हेअरस्टाइल करताना काय काळजी घ्याल? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 5:47 PM 1 / 10१. केसांचं गळणं खूप जास्त वाढलं असेल तर हेअरस्टाईल करण्यात तुमचं काही चुकत तर नाही ना हे एकदा तपासून बघितलंच पाहिजे. कारण चुकीच्या पद्धतीने बांधलेले केस मुळापासूनच कमजोर होत जातात आणि मग अलगद तुटून पडतात.2 / 10२. एकच एक हेअरस्टाईल कायम करण्याची सवय अनेक जणींना असते. वर्षानुवर्षे तिच हेअरस्टाईल ठेवली तरी विशिष्ट भागातले केसच ताणले जातात, हळू- हळू तुटतात आणि मग हेअर लाईन मागे- मागे सरकत जाते.3 / 10३. आपल्या केसांचा भांगही कायम बदलला पाहिजे. नाहीतर अशा पद्धतीने तो भांग वाढत जातो आणि मग टक्कल दिसू लागते. ज्या महिला भांग पाडतच नाहीत, त्यांनी किमान रात्री झोपताना तरी मधून भांग पाडायला हवा.4 / 10४. अनेक जणींना घरात असताना अशा पद्धतीने केस बांधण्याची सवय असते. ही सवय केसांसाठी हानिकारक आहे.5 / 10५. कारण त्यामुळे अशा पद्धतीने केस गळती होऊ शकते. त्यामुळे घरी असताना कायम केसांचा अंबाडा बांधून ठेवू नका.6 / 10६. ओले केस वाळू न देता तसेच वर बांधून ठेवण्याची सवयही अनेकींना असते. ओले केस आधीच मुळांपाशी कमकुवत झालेले असतात. त्यामुळे घट्ट बांधल्याने ते लगेच गळून पडतात.7 / 10७. कायम अशा पद्धतीने उंच पोनीटेल घालण्याची सवय असेल, तरीही ती केसांच्या दृष्टीने हानिकारक आहे.8 / 10८. अशा पद्धतीचे हेअर एक्स्टेंशन वारंवार लावत असाल, तरीही केस गळती वाढते.9 / 10९. स्ट्रेटनिंग, कर्ल्स असे प्रकार सारखे- सारखे केल्यानेही केसांची मजबुती हळूहळू कमी होत जाते.10 / 10 १०. टु व्हिलरवरून फिरताना, किंवा अतिशय वारं असताना केस माेकळे ठेवत असाल तरीही केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. आणखी वाचा Subscribe to Notifications