कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

Published:October 14, 2024 12:01 PM2024-10-14T12:01:09+5:302024-10-14T12:11:11+5:30

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

आपल्या त्वचेला हल्ली नेहमीच धूळ, प्रदूषण, ऊन या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि कमी वयातच मग चेहरा सुरकुतलेला, वयस्कर झाल्यासारखा दिसू लागतो.(how to keep your skin always young and beautiful?)

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

असं होऊ नये आणि त्वचेचं सौंदर्य अधिक काळ टिकून राहावं म्हणून या काही गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. (how to reduce wrinkles or fine lines on skin?)

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नका. आपण घरातच आहोत, उन्हात जात नाही. मग सनस्क्रीन लोशनची काय गरज असं म्हणू नका. एसपीएफ ४० किंवा त्यापेक्षा जास्त असणारं सनस्क्रीन नियमितपणे चेहऱ्याला वाला.

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

तुमची त्वचा नेहमीच मॉइश्चराईज ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी चांगल्या दर्जाचं मॉईश्चरायझर घ्या आणि ते दिवसातून दोन वेळा तरी चेहरा स्वच्छ धुवून लावा.

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नाईट केअर रुटीन अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी साधं खोबरेल तेलाचे काही थेंब हातावर घेऊन त्वचेला हलक्या हाताने मालिश केली तरी चालेल. यामुळे रात्रभर त्वचेला छान पोषण मिळेल. तुम्ही यासाठी साजूक तूप, बदाम तेल यांचाही वापर करू शकता.

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात देणारी फळं आणि भाज्या तसेच सुकामेवा असू द्या, असं सौंदर्यतज्ज्ञ मोनिका कपूर सांगतात.

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

व्हिटॅमिन सी असणारच स्क्रब, व्हिटॅमिन सी सिरम या गोष्टींनी तुमच्या चेहऱ्याला मसाज करा. लिंबू, संत्री, पपई यांच्यामध्येही व्हिटॅमिन सी असते. त्याचा वापर करून घरगुती फेसपॅक चेहऱ्याला लावला तरी चालेल.

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

पुरेशी झोप घ्या. आरोग्यासाठी झोप जशी गरजेचे आहे, तसंच सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठीही महत्त्वाची आहे.

कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या आल्या? ७ टिप्स- वय वाढलं तरी चेहरा दिसेल तरुण- सुंदर

योग्य प्रमाणात पाणी प्या. त्यामुळे संपूर्ण शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार राहाते. ड्राय होत नाही.