Join us   

How To Remove Pimples Spots : पिंपल्समुळे चेहऱ्यावर काळे डाग, खड्डे पडलेत? ३ उपाय, चेहरा दिसेल ग्लोईंग डागविरहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 12:51 PM

1 / 5
चेहऱ्यावर जास्तीचे तेल जमा होऊ लागले की पुरळ खूप येतात.. यामुळे चेहरा खूपच खराब दिसू लागतो आणि पिंपल्स दूर झाल्यानंतर डाग तयार होतात तेव्हा समस्या वाढते. (How To Remove Pimples Spots) त्यामुळेच या समस्येला सुरुवातीलाच आळा घालणे आवश्यक आहे. ही समस्या काही खास मार्गांनी सोडवली जाऊ शकते. बहुतेक त्वचा तज्ज्ञ यासाठी टोनरची मदत घेतात. (Skin toners for pimple removal tips rose water neem leaves gulab jal black spot on face)
2 / 5
ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे, त्यांना मुरुमांच्या समस्येला अधिक सामोरे जावे लागते, परंतु आता घाबरण्याची गरज नाही कारण हट्टी मुरुमांवर एक नैसर्गिक उपचार आहे. यासाठी तुम्ही घरगुती टोनर वापरू शकता.
3 / 5
नावाप्रमाणेच टोनर त्वचेला टोन करण्याचे काम करते आणि यामुळे चेहरादेखिल स्वच्छ होतो. स्वच्छ आणि सुंदर त्वचेसाठी टोनर उपयुक्त मानले जाते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही रोज वापरू शकता.
4 / 5
एलोवेरा जेल काही लोकांच्या त्वचेला सुट होत नाही, त्याऐवजी तुम्ही गुलाबजल टोनर वापरू शकता. ते तयार करण्यासाठी, गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळा, नंतर सफरचंद सायडर व्हिनेगर घाला आणि जवळपास 15 दिवस हे तसेच ठेवा. नंतर चेहऱ्यावर लावा किंवा कापसाच्या मदतीने दिवसातून 3 वेळा स्प्रे करा.
5 / 5
कडुलिंबाच्या पानांचे औषधी गुणधर्म आपल्या सर्वांना माहीत आहेत, ते त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. त्याचा टोनर बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळवा, नंतर तेच पाणी एका भांड्यात भरून त्यात सफरचंदाचा व्हिनेगर मिसळा. दिवसातून सुमारे 4 वेळा वापरा. ही पायरी नियमितपणे पाळल्यास मुरुमांमुळे होणारे डाग निघून जातील.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी