1 / 6उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण उन्हात थोडं जरी घराबाहेर गेलं तरी त्वचा टॅन होते.(how to remove tanning?)2 / 6ज्या महिलांना नेहमीच दुचाकी चालवावी लागते त्यांचे हात उन्हाळ्यात विशेष काळे पडतात. कारण सनकोट किंवा ग्लोव्ह्ज घातले तरी हात काळवंडून जातात.(homemade tan remover for hand)3 / 6म्हणूनच टॅनिंग होऊन काळे पडलेले हात पुन्हा स्वच्छ करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडी हळद घ्या. 4 / 6त्यामध्ये खोबरेल तेल घालून हळद व्यवस्थित कालवून घ्या. हा लेप तुमच्या हाताला लावा आणि लिंबाची एक फोड घेऊन त्या फोडीने हात घासून काढा. यानंतर हात स्वच्छ धुवून घ्या. टॅनिंग बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असेल. 5 / 6हातावरचं टॅनिंग कमी करण्याासाठी तुम्ही हा आणखी एक उपाय करून पाहू शकता.. खोबरेल तेल, हळद या पदार्थांमध्ये थोडं बेसन पीठ घाला आणि हा लेप हाताला लावा. ४ ते ५ मिनिटांत लेप सुकत आला की चोळून तो काढून टाका. यामुळेही टॅनिंग कमी होईल..6 / 6पिठीसाखर, मध आणि लिंबाचा रस हे ३ पदार्थ एकत्र कालवून हा लेप हाताला लावा. ४ ते ५ मिनिटे तो हातावर तसाच राहू द्या आणि त्यानंतर चोळून काढून टाका. यानंतर थंड पाण्याने हात धुवा. हातामध्ये खूपच चांगला फरक पडलेला दिसेल.