नवीन कपडे धुताना खूप रंग जातो? पाण्यात १ वस्तू घाला, कपडे जुने होईपर्यंत रंग जाणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:34 AM 1 / 8जेव्हाही आपण बाजारातून कपडे विकत घेतो तेव्हा त्याचा रंग तर जाणार नाही ना अशी भिती मनात येते. कॉटनच्या निळ्या, लाल, गुलाबी रंगाचे कपडे नेहमी रंग सोडतात. पहिल्यांदा कपडे धुतल्यानंतर कपड्यांचा रंग निघ जास्त निघतो तर दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा धुतल्यानंतर रंग पूर्णच बदलतो.2 / 8ज्यामुळे कपडे फेड होत जातात. कपडे धुताना रंग जाऊ नये म्हणून काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर तुमचं काम अधिकच सोपं होऊ शकतं. कपडे धुण्याच्या सोप्या ट्रिक्स कोणत्या आहेत.3 / 8सगळ्यात आधी बादलीत ५० ते ६० ग्राम तुरटी घाला. यात २ चिमुट मीठ घाला. हळूहळू कपड्यांवर हे पाणी घाला. कपडे उकळत्या पाण्यात घाला. कपडे कमीत कमी २ तासांसाठी भिजवून ठेवा. 4 / 8हळूहळू कपडे स्वच्छ पाण्यात घाला. जेणेकरून मीठ आणि तुरटी व्यवस्थित मिसळली जाईल. या उपायामुळे कपड्यांचा रंग निघणार नाही. फक्त एकदा निघेल पुन्हा पुन्हा निघत राहणार नाही. 5 / 8कपड्यांवर मीठ आणि तुरटीचा वापर केल्यानंतर तुम्ही व्हिनेगरही वापरू शकता. यामुळे कपड्यांचा रंग फेड होणार नाही. व्हिनेगरच्या पाण्यात तुम्ही घालू शकता. कमीत कमी अर्ध्या तासासाठी कपडे भिजवून ठेवा. 6 / 8कपडे सुकवायला ठेवा. लक्ष राहू द्या की कपडे सावलीत सुकवायला हवेत. ऊन्हात सुकवल्यामुळे कपड्यांचा रंग फेड होतो. याचा वापर करण्याआधी कपड्यांवरचे लेबल व्यवस्थित वाचायला हवं.7 / 8कपडे धुण्यासाठी मीठाचा वापर करू शकता. त्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. कपडे धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. 8 / 8उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्ही कॉटन साडी किंवा कॉटनच्या चादरीचा वापर करू शकता. या ट्रिकमुळे कपडे एकदम नव्यासारखे कोरे दिसतील. आणखी वाचा Subscribe to Notifications