How to stop hair fall immediately : केस फार गळतात, तेल शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? फक्त १ उपाय महिनाभरात देईल दाट केस Published:March 10, 2022 12:59 PM 2022-03-10T12:59:36+5:30 2022-03-10T13:18:44+5:30
How to stop hair fall immediately at home : जर तुम्हाला रेशमी आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही पेरूची पाने तेलात मिसळून लावू शकता. यासाठी प्रथम पेरूची पाने धुवून चांगली बारीक करून घ्यावीत. केस गळणं ही सध्याची खूप कॉमन समस्या बनलीये. सगळ्याच वयोगटात केस गळून गळून पातळ होण्याची समस्या उद्भवत आहे. पार्लरच्या ट्रिटमेंट, वेळेच्यावेळी आहार घेऊनही अनेकांना या समस्येपासून आराम मिळत नाही. (How to Stop hair lose naturally) या लेखात केसांचं गळणं थांबवण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहोत याचा वापर तुम्ही लांबसडक, दाट केस मिळवू शकता. (Hair Care Tips for Hair fall)
पेरू हे चव आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींनी परिपूर्ण असल्याने ते अनेकांचे आवडते फळ आहे. पेरूची पाने औषधी गुणधर्मांनी देखील समृद्ध आहेत. आरोग्यासोबतच हे केस आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. पेरूच्या पानांचा वापर केल्यास केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते. हे फक्त एकच नव्हे तर अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते. (Hair fall control tips guava leaves for hair know 4 ways to use it)
जर तुम्हीही केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर पेरूच्या पानांचा वापर सुरू करा. खरं तर, आपण अनेकदा कोरफड, कडुलिंब, कढीपत्ता यांसारख्या गोष्टी वापरतो, परंतु अनेक वेळा लोकांना त्याचा विशेष प्रभाव पाहायला मिळत नाही. केसांमध्ये काही नवीन करून बघायचे असेल तर पेरूच्या पानांचा वापर करता येईल.
केसांची निगा जितकी नैसर्गिकरित्या राखली जाते. तितकीच ती अधिक चांगली मानली जाते. हे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय त्यांना निरोगी बनविण्यात मदत करते. दुसरीकडे, पेरूची पाने केवळ केस गळण्यापासून रोखत नाहीत तर ते रेशमी आणि चमकदार देखील करतात.
केसांचं गळणं कसं थांबवायचं?
केस गळण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर पेरूच्या पानांमध्ये मेथी दाणे मिसळा. यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात २ ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यात २ चमचे मेथीचे दाणे घालून ४ मिनिटे उकळू द्या. यानंतर 10 पेरूची पाने धुवून मिक्स करा. दोन्ही नीट उकळा, म्हणजे पाण्याचे प्रमाण निम्मे होईल. त्यानंतर स्प्रे बाटलीत गाळून घ्या. फिल्टर केल्यानंतर, स्प्रे बाटलीने आपल्या टाळूवर स्प्रे करा. 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.
तेलात मिसळून लावा
जर तुम्हाला रेशमी आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही पेरूची पाने तेलात मिसळून लावू शकता. यासाठी प्रथम पेरूची पाने धुवून चांगली बारीक करून घ्यावीत. आता त्याच्या पेस्टमध्ये तुमचे नेहमीचे तेल मिसळा. केसांच्या लांबीनुसार हे मिश्रण तयार करा. त्यानंतर केसांना लावा आणि 1 तास राहू द्या. त्यानंतर केस धुवा. तुम्हाला हवे असल्यास पेरूची पाने तेलात उकळूनही लावू शकता. जसे कढीपत्ता मिसळला जातो.
केस वाढवण्यासाठी हेअरपॅक
पेरूची पाने केसांसाठी टॉनिक म्हणून काम करतात. केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही हे करू शकता. इतकेच अनेक स्त्रिया ते कोरडे करून पावडर म्हणून साठवतात. जेव्हा गरज असेल तेव्हा त्याच्या पावडरपासून हेअर पॅक बनवा. यासाठी तुमच्या केसांच्या लांबीनुसार 2 ते 3 चमचे किंवा पेरूच्या पानांची पावडर घ्या आणि त्यात अंडी मिसळा. आता हे मिश्रण केसांना लावा. यात अंड्यांऐवजी, इतर कोणतेही घटक मिसळले जाऊ शकतात जे आपल्या केसांना सूट होतील.
पेरूची पानं वापरताना अशी घ्या काळजी
जर तुम्हाला पेरूच्या पानांचा सकारात्मक परिणाम तुमच्या केसांवर दिसावा अस वाटत असेल तर केस धुतल्यानंतर ते लावा. कारण गलिच्छ आणि धूळयुक्त टाळूवर लावल्याने तुम्हाला फायदा होणार नाही.
जर तुम्हाला पेरूच्या पानांचा सकारात्मक परिणाम तुमच्या केसांवर दिसावा अस वाटत असेल तर केस धुतल्यानंतर ते लावा. कारण गलिच्छ आणि धूळयुक्त टाळूवर लावल्याने तुम्हाला फायदा होणार नाही. याशिवाय पेरूच्या पानांचा वापर करताना इतर कोणतेही रसायनयुक्त हेअर पॅक किंवा तेल लावू नका. चांगल्या परिणामांसाठी आठवडाभर किंवा महिनाभर हा उपाय करून बघा.