केस पातळ झालेत, वेणी बारीक दिसते? वाटीभर तांदळाच्या पाण्याची जादू; लांब-दाट होतील केस Published:July 29, 2023 10:49 AM 2023-07-29T10:49:49+5:30 2023-07-29T12:19:57+5:30
How to stop hair fall using home remedies : जर तुमचे केस गळत असतील तर केसांना तांदळाचे पाणी लावून हळू हळू मसाज करा. यामुळे केसांचे संरक्षण होते आणि केस गळणे कमी होते. सुंदर केस हे आपल्या सौंदर्यात भर घालतात, आत्मविश्वासही वाढतो. आजकालच्या तणावपूर्ण वातावरणात लांब केस मिळवणं कठीण झालंय. गळणारे केस, केसांत कोंडा होणं, केस कोरडे पडणं असा त्रास जाणवतो. तांदळाचं पाणी वापरून तुम्ही केस गळण्याच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.
तांदळाचे पाणी केसांसाठी प्रभावी उपाय मानले जाते. तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या केसांसाठी फायदेशीर असतात. हे केसांना केवळ मजबूत करत नाही तर त्यांना मऊ, चमकदार आणि सुंदर बनवतात. तांदळाच्या पाण्याचा वापर करून केसांच्या समस्या टाळू शकता.
जर तुमचे केस गळत असतील तर केसांना तांदळाचे पाणी लावून हळू हळू मसाज करा. यामुळे केसांचे संरक्षण होते आणि केस गळणे कमी होते.
केसांवर तांदळाचे पाणी लावल्याने कोंडा दूर होतो. यासाठी तांदळाचे पाणी केसांवर किमान तासभर राहू द्या आणि नंतर पाण्याने केस धुवा.
केस लवकर कोरडे केल्याने ते कमकुवत होऊ शकतात. केसांना तांदळाचे पाणी लावल्याने त्यांना पोषण मिळते आणि मऊ राहतात.
तांदळाचे पाणी वापरून केसांची चमक वाढवता येते. यासाठी धुतलेल्या केसांवर तांदळाचे पाणी लावून १५-२० मिनिटे ठेवा. त्यानंतर केस उन्हात वाळवा.
तांदळाचे पाणी वापरल्यानंतर केस नियमित धुणे महत्वाचे आहे, अन्यथा कोंडा होऊ शकतो. याशिवाय तुमच्या केसांमध्ये काही समस्या असल्यास तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.