थंडीत त्वचा कोरडी पडली? अंगावर पुरळ आली, खाज सुटली? ४ उपाय, त्वचेच्या तक्रारी कमी
Updated:December 27, 2022 16:29 IST2022-12-27T15:59:10+5:302022-12-27T16:29:41+5:30

१. चिकन स्किन हा त्वचेचा एक प्रकारचा आजार किंवा त्वचेला झालेला संसर्ग आहे. यालाच आपण केराटोसिस पिलारिस (Keratosis Pilaris) असं म्हणताे
२. काही महिन्यांपुर्वी अभिनेत्री यामी गौतम हिनेदेखील तिला हा आजार असल्याचं सांगितलं होतं. मुळात हा आजार त्वचेच्या इतर आजारांसारखा गंभीर मुळीच नाही. पण यामध्ये हाताचे कोपरे, गुडघे यांच्याभोवती काळे किंवा चॉकलेटी रंगाचे बारीक- बारीक पुरळं उठल्याप्रमाणे दिसते.
३. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडल्याने हातावरचे, गुडघ्यांवरचे पुरळ वाढत जातात. काही जणांना तर त्याठिकाणी खाजही येते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत या आजाराचा त्रास वाढू नये, यासाठी हे काही उपाय करून बघा.
४. थंडी वाजते म्हणून खूप गरम किंवा कडक पाणी घेऊन आंघोळ करण्याची सवय अनेकांना असते. चिकन स्किनचा त्रास असणाऱ्यांनी कडक पाण्याने आंघोळ टाळावी. यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढून आजार वाढण्याची शक्यता असते.
५. त्याचप्रमाणे खूप वेळ आंघोळ केल्यानेही त्वचेचे डिहायड्रेशन होते. त्यामुळे थंडी वाजतेय म्हणून आंघोळ करताना खूप वेळ अंगावर गरम पाणी घेणे टाळावे.
६. दररोज आंघोळ झाल्यानंतर आणि रात्री झोपताना त्वचेला व्यवस्थित मॉईश्चराईज करा. त्वचेतलं मॉईश्चर व्यवस्थित सांभाळलं तर अंग कोरडं पडणार नाही.
७. आंघोळ झाल्यानंतर एखाद्या खडबडीत कपड्याने किंवा टॉवेलने चिकन स्किन असलेली जागा नेहमीच हळूवार हातांनी घासत चला. यामुळे त्या भागावरची डेड स्किन कमी होत जाईल.
८. थंडीमुळे कोरडं पडल्याने अंग खाजवतं. पण चिकन स्किन असलेला भाग मुळीच खाजवू नका. संसर्ग वाढत जाईल. किंवा ती जागा रक्ताळेल.