१ वाटी पुदिन्याचे ५ हेअर मास्क, उन्हात डोकं राहील थंड आणि केसही होतील सुंदर...
Updated:April 5, 2025 11:48 IST2025-04-05T10:41:56+5:302025-04-05T11:48:38+5:30
Hair Care Tips : How To Use Mint For Making Hair Mask : Make Your Hair Super Healthy With Mint Hair Masks : Try this peppermint hair mask to soothe your summer scalp & hair : Amazing Benefits Of Mint For Hair : How to use mint hair mask during summer : उन्हाच्या तडाख्यापासून केसांचे रक्षण करण्यासाठी पुदिन्याचे हे ५ हेअर मास्क...

उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशापासून आपल्या ( How To Use Mint For Making Hair Mask) केसांचे संरक्षण केले नाही, तर केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यातील (Make Your Hair Super Healthy With Mint Hair Masks) या कडक उन्हाचा व प्रखर उष्णतेचा परिणाम केसांवर दिसू नये म्हणून वेळीच केसांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी आपण पुदिन्याचे काही घरगुती हेअर मास्क देखील तयार करु शकतो.
उन्हाच्या तडाख्यापासून केसांचे रक्षण करण्यासाठी ( Try this peppermint hair mask to soothe your summer scalp & hair) पुदिन्याचे हे ५ हेअर मास्क आपण नक्की ट्राय करून बघू शकता.
१. पुदिना आणि दही :-
पुदिना आणि दही, हे दोन्ही असे पदार्थ आहेत, ज्यांच्या वापराने स्काल्प आणि केसांना उन्हाळ्यात थंडावा मिळू शकतो. यासाठी पुदिना बारीक करून त्याची पेस्ट तयार करा आणि नंतर दोन चमचे दह्यामध्ये चांगले मिसळा. हा तयार हेअर मास्क स्काल्पपासून केसांच्या खालच्या टोकापर्यंत पूर्णपणे लावा. एक तासानंतर केस स्वच्छ धुवा.
२. पुदिना आणि काकडी :-
उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही त्याची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. यासाठी पुदिना व काकडीचा रस एकत्रित मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट स्काल्पवर आणि केसांवर लावा आणि अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवून टाका. यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळेल आणि काही दिवसांत तुम्हाला त्याचा परिणाम केसांवर दिसायला लागेल. काकडीमुळे केसांना नैसर्गिक चमक येण्यास मदत होईल.
३. पुदिना आणि मध :-
काहीवेळ उष्णतेमुळे केस खूप कोरडे होतात. अशा परिस्थितीत, तुम्ही पुदिन्याचा रस काढून मग त्यात मध मिसळून हेअर मास्क तयार करू शकता. आता हा हेअर मास्क स्काल्पवर आणि केसांवर लावा आणि अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवून टाका. मास्क लावल्याने तुमचे केस मुळांपासून मजबूत होतीलच पण केसांना नैसर्गिकरित्या ओलावाही मिळेल.
४. पुदिना आणि एलोवेरा जेल :-
उन्हाळ्यात केसांना थंडावा देण्यासाठी, तुम्ही पुदिना आणि एलोवेरा जेल यांचे मिश्रण वापरून हेअर मास्क बनवू शकता. हे दोन्ही पदार्थ चांगले मिसळा आणि केसांना लावा. एका तासानंतर केस धुवा. पुदिन्यामुळे केसांनाआणि स्काल्पला थंडावा मिळेल तर एलोवेरा जेल मुळे केस मऊमुलायम आणि चमकदार होतील.
५. पुदिना आणि पपई :-
पुदिना आणि पपईचा हेअर मास्क बनवणे देखील खूप सोपे आहे. यासाठी पिकलेला पपई नीट मॅश करा. यानंतर त्यात पुदिन्याचा पानांचा रस घाला आणि चांगले मिसळा. केसांवर हा हेअर मास्क लावून १० मिनिटे ठेवा यामुळे स्काल्प एक्सफोलिएट होईल आणि केसांना नैसर्गिक चमक येईल.