बघा स्वयंपाक घरातल्या 'या' पांढऱ्या पदार्थाची जादू- त्वचा आणि केस दोन्हींसाठी ठरतो वरदान By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 12:20 PM 1 / 8हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या खूपच जास्त वाढली आहे. अगदी कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुलांचे केसही आता बऱ्यापैकी पांढरे झालेले दिसतात.2 / 8शिवाय केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केसांची वाढ न होणे, या समस्याही आहेतच.3 / 8केसांच्या समस्या जशा वाढतात, तशाच त्वचेच्या तक्रारीही वाढतात.4 / 8अनेक जणींना चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स दिसणे अशा समस्या असतात. त्वचेच्या या तक्रारी आणि केसांच्या समस्या कमी करायच्या असतील तर त्यासाठी तुरटी अतिशय गुणकारी ठरते. 5 / 8केस पांढरे होऊ नयेत म्हणून १ चमचा तुरटीची पावडर घ्या. त्यात २ चमचे तेल टाका आणि या मिश्रणाने केसांच्या मुळाशी मालिश करा. केस पांढरे होणार नाहीत.6 / 8हाताचे कोपरे किंवा अंडरआर्म्स काळे पडले असतील तर तुरटी पावडर आणि तेल हे मिश्रण त्या काळ्या भागावर लावा. काळपटपणा कमी होईल.7 / 8आंघोळीच्या पाण्यात ४ ते ५ वेळा तुरटी फिरवा आणि मग त्या पाण्याने आंघोळ करा. शरीराचा दुर्गंध दूर होईल. 8 / 8तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. त्वचा अधिककाळ तरुण राहण्यास मदत होते, तसेच त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेचा पोत एकसारखा होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications