ऑफिससाठी फॉर्मल पण स्टायलिश पंजाबी ड्रेस कसे निवडाल? ८ डिझाइन्स, दिसा एकदम स्मार्ट-प्रोफेशनल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 3:51 PM 1 / 9रोज ऑफीसला जाताना काय घालायचं असा प्रश्न महिलांना कायम पडतो. नेहमीच आपण फॉर्मल शर्ट आणि पँट घालतो असं नाही. (Indian Office ware Formal Look) आपण साधारणपणे कुर्ते किंवा पंजाबी सूट जास्त वापरतो. पण यातही स्टायलिश दिसावं असं वाटत असेल तर त्यांची निवड योग्य पद्धतीनं करणं गरजेचं असतं (Formal Panjabi Suit kurta). 2 / 9सलवार कुर्ता किंवा पंजाबी सूट हे कधीही कम्फर्टेबल प्रकारचे कपडे असल्याने ऑफीसला जाताना आपण छान कॉटनचे कम्फर्टेबल असे कुर्ते आणि लेगीन्सचा विचार करु शकतो. कुर्त्यांमध्येही स्ट्रेट कट, कट नसलेले, घेरदार, लॉंग कुर्ते, शॉर्ट कुर्ते असे बरेच प्रकार ट्राय करता येतात. 3 / 9ऑफीसला जाताना शक्यतो खूप गडद रंगाचे कुर्ते घालणे टाळावे. त्यापेक्षा पेस्टल रंग किंवा आपल्यावर खुलून येतील अशा रंगाचे कपडे घालावते. गुलाबी, आबोली, पिस्ता, आकाशी, काळा, ग्रे अशा शेडमधले रंग घातल्यास आपण सगळ्यांमध्ये उठून दिसतो आणि फ्रेश रंगांमुळे आपले व्यक्तिमत्त्व आणखी खुलते. 4 / 9पंजाबी ड्रेस किंवा लेगीन्स आणि कुर्ता ही फॅशन आता काहीशी मागे पडली. त्याऐवजी आता कुर्ता आणि स्ट्रेट पँट असा सेट घालण्याचा ट्रेंड आहे. कॉटनमध्ये सध्या अशाप्रकारच्या सेटला महिलांची पसंती असून यातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट आणि डिझाईन उठूनही दिसतात. 5 / 9ऑफीसला पंजाबी ड्रेस वापरत असाल तर नेकलाईनकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जास्त मोठा गळा किंवा खूप डीप गळा असलेले कुर्ते किंवा कपडे ऑफीसमध्ये घालणे टाळावे. त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होण्याची शक्यता असते. यामध्ये आपण स्टँड कॉलर किंवा साधा गोल, चौकोनी, पानाच्या आकाराचा गळा असलेले कपडे नक्की वापरु शकतो. 6 / 9ऑफीसच्या कपड्यांच्या बाह्या शक्यतो पूर्ण किंवा थ्री फोर्थ स्लिव्हज असाव्यात. यामुळे तुमच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन बदलतो. कोपरापर्यंतच्या बाह्याही फॉर्मल लूकसाठी चांगला पर्याय आहे. पण शक्यतो मेगा स्लिवज किंवा स्लिव्हलेस बाह्यांचे कपडे ऑफीसमध्ये घालणे टाळायला हवे. 7 / 9ऑफीसमध्ये आपल्याला दिवसभर काम करायचे असल्याने आपले कपडे कम्फर्टेबल असणे आवश्यक असते. अशावेळी शक्यतो कॉटन, लिनन, कॉटन सिल्क अशाप्रकारचे हलके आणि कॅरी करायला सोपे असलेल्या कापडाचे पंजाबी किंवा कुर्ता वापरावा. सिल्क, नायलॉन, जॉर्जेट अशी कापडे शक्यतो ऑफीसवेअरसाठी वापरु नयेत. तसेच भरजरी प्रिंट आणि डिझाईन असलेले कपडेही ऑफीसमध्ये घालून जाऊ नये. 8 / 9ऑफीसच्या कपड्यांवर कानातले, ब्रेसलेट, अंगठी, घड्याळ यांची निवड करताना ते मोत्याचे किंवा नाजूक खड्याचे असतील याची काळजी घ्यावी. खूप चकमकीत किंवा मोठ्या आकाराचे दागिने ऑफीसला घातल्यास आपला लूक फॉर्मल न होता तो खराब होण्याची आणि सगळे आपली चेष्टा करण्याचीच शक्यता जास्त असते. 9 / 9ऑफीसमध्ये तुम्ही पंजाबी घालत असाल तर ओढणीऐवजी एखादे हाफ किंवा फूल जॅकेट मस्त दिसते. इतकेच नाही तर एखादा लहानसा स्कार्फही अशावेळी पेयर करता येऊ शकतो. त्यामुळे ओढणी घेऊन ती सांभाळत बसण्यापेक्षा हे पर्याय केव्हाही तुम्हाला प्रोफेशनल आणि स्मार्ट लूक देण्यास उपयुक्त ठरतात. आणखी वाचा Subscribe to Notifications