जावेद हबीब सांगतात घरी हेअर कलर करताना 'ही' चूक करणं पडेल महागात- केसांचं होईल नुकसान
Updated:January 21, 2025 09:10 IST2025-01-21T09:07:25+5:302025-01-21T09:10:02+5:30

केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. अगदी कमी वयातच केस पांढरे होत आहेत. कॉलेजमधल्या निम्म्या तरुणाईचे केस पांढरे आहेत.
पांढरे केस लपविण्यासाठी मेहेंदी लावण्याचा उपाय अनेकजण करतात. पण तो बराच वेळखाऊ असल्याने अनेकांना नको वाटतं.
त्यामुळे मग हेअर कलर करण्याचा सोपा उपाय अनेकजण निवडतात. दरवेळी पार्लरमध्ये जाऊन केस कलर करणं परवडण्यासारखं नाही. त्यामुळे मग हेअर कलरने केसांना टचअप करायचं काम काही जण घरीच करतात.
पण घरच्याघरी हेअर कलर करताना १ चूक करणं कटाक्षाने टाळायला हवं असं ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब सांगत आहेत.
याविषयी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून ते म्हणतात की हेअर कलर करताना तो जेवढ्या वेळ केसांवर ठेवायला सांगितलेला असतो, तेवढाच वेळ केसांवर राहू द्यावा आणि नंतर लगेचच केस धुवून टाकावे.
त्यापेक्षा जास्त वेळ केसांवर हेअर कलर ठेवत असाल तर त्यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं, केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं.