Jawed Habib Tips : शॅम्पू, कंडिशनर संपलं तर केस कसे धुवायचे? जावेद हबीबनं सांगितल्या केस धुण्याच्या परफेक्ट ट्रिक्स Published:September 2, 2021 12:15 PM 2021-09-02T12:15:22+5:30 2021-09-02T12:32:16+5:30
Jawed Habib Tips : बऱ्याच लोकांच्या त्वचेची संवेदनशीलता इतकी जास्त असते की काही नैसर्गिक गोष्टी वापरल्याने केस गळती होऊ शकते, म्हणून जर तुम्हाला कोणतीही एलर्जी किंवा हार्मोनल समस्या असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्याला केसांसाठी अनेक घरगुती उपाय माहित असतात ज्यामुळे केस चमकदार होता. पण शॅम्पूला चांगला क्लींजिंग एजेंट समजला जातो. शॅम्पूच्या वापरानं केस मऊ, स्वच्छ होतात. तर कंडिशनरमुळे केसांना पोषण मिळते. प्रत्येकाला शॅम्पूनं केस धुण्याची सवय झालेली असते.
पण ऐनवेळी शॅम्पू संपला असेल तर केस कशानं धुवायचे हा मोठा प्रश्न असतो अंघोळीच्या साबणानं केस धुवायचे म्हटलं तर केस नेहमीसारखे चमकदार दिसत नाहीत. जावेद हबीबनं अशावेळी केस धुण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरायच्या हे सांगितलं आहे.
पूर्वी लोक वेगवेगळ्या नैसर्गिक मार्गांनी केस धुवायचे आणि राख, शिकेकाई, आवळा वगैरे हेअर केअररूटीनमध्ये वापरल्या जात असत, पण आता असेच काही करायचे असेल तर? केस धुण्यासाठी आता तुम्हाला शॅम्पू किंवा कंडिशनरऐवजी नैसर्गिक उत्पादने वापरावी लागली तर? त्यांचा वापर कसा करायचा हे सुद्धा माहित असायला हवं.
बेकिंग सोड्याचा वापर
बेकिंग सोडा अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरला जातो. बेकिंग सोडा त्वचेवर वेगवेगळ्या पद्धतींनी लावता येऊ शकतो. काहीजण याचा वापर योग्य मानतात तर काहींना आवडत नाही. पण जर तुमचा शॅम्पू संपला असेल, तर जावेद हबीबच्या मते, तुम्ही काही प्रमाणात बेकिंग सोडा वापरू शकता. जर तुमचा टाळू अस्वच्छ असेल किंवा तुम्ही खूप कोरडा असेल तर बेकिंग सोडा ते साफ करण्याचे उत्तम काम करू शकते. पण जास्त प्रमाणात वापरू नका. ओल्या केसांवर पाण्यात बेकिंग सोडा पाण्यात मिसळून ते मिश्रण केसांना लावा आणि २ मिनिटांनी केस धुवून टाका.
एप्पल सायडर व्हिनेगर
जर तुमचे केस खूप घाणेरडे आणि तेलकट असतील तर बेकिंग सोडासह एप्पल सायडर व्हिनेगर वापरता येईल. त्यासाठी तुम्हाला 1 भाग बेकिंग सोडा आणि 2 भाग सायडर व्हिनेगर वापरावं लागेल. आपल्या टाळूवर दोन मिनिटे या मिश्रणानं मालिश केल्यानंतर केस धुवून टाका.
आवळा आणि शिकेकाई
शॅम्पूऐवजी सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आवळा आहे आणि शिकाकाई कंडिशनरचे काम करते. आवळा पावडर आणि शिकेकाई मिक्स करून रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी केस धुवा. यामुळे तुमचे केस देखील खूप सुंदर होतील. आवळ्यांतील गुणधर्मांमुळे तुमच्या टाळूवरील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
अंड्याचा पिवळा भाग
जर कंडिशनर संपले असेल तर आपण त्याऐवजी काय वापरावे असा प्रश्न अनेकांना पडतो. अंड्यांना नेहमीच केसांसाठी चांगले मानले गेले आहे आणि अंड्यातील पिवळ बलक नेहमी केसांना मॉइस्चराइज करण्यासाठी वापरले जाते. तुम्ही फक्त तुमच्या ओल्या केसांना थोडा अंड्याचा पिवळ बलक आणि नंतर ते पाण्याने धुवा. अंड्यांचा वास दूर करण्यासाठी, आपण इसेंशियल ऑईलचे काही थेंब पाण्यात मिसळून केसांमध्ये लावू शकता. त्यापेक्षा जास्त करण्याची गरज नाही. आपले केस स्वच्छ केल्यानंतर कंडिशनरऐवजी अंडी वापरा
एलोवेराचा वापर
केसांसाठी एलोवेरा फार महत्वाचा आहे. एलोवेरात अनेक बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे केवळ टाळूचे अतिरिक्त तेल काढून न टाकता केसांना निरोगी आणि चमकदार बनवतात. केसांमध्ये ओलावा नसल्यास कंडिशनरऐवजी कोरफडीचा वापर केला जाऊ शकतो.
ऑईल थेरेपी
केसांच्या वाढीसाठी, त्यांना तेल लावणे खूप महत्वाचे आहे. याला कंडिशनिंग एजंट म्हणून हाताळा कारण जर तुम्ही तुमच्या केसांना व्यवस्थित तेल लावले तर नंतर कंडिशनरची गरज भासत नाही. तेल लावल्यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा, म्हणजे तुम्हाला कंडिशनर वापरण्याची गरज नाही. यासाठी हॉट ऑयल थेरेपी सगळ्यात चांगली ठरू शकते.
केसांची काळजी घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
१) बऱ्याच लोकांच्या त्वचेची संवेदनशीलता इतकी जास्त असते की काही नैसर्गिक गोष्टी वापरल्याने केस गळती होऊ शकते, म्हणून जर तुम्हाला कोणतीही एलर्जी किंवा हार्मोनल समस्या असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पॅच टेस्ट करा. मगच हे उपाय वापरा.
२) कोणत्याही घटकाची एलर्जी असल्यास हे उपाय वापरू नका. बेकिंग सोडा आणि एपल सायडर व्हिनेगर दोन्ही अम्लीय आहेत आणि बर्याच लोकांना सूट होत नाहीत. म्हणून तुम्ही पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
३) हे नैसर्गिक घटक आहेत त्यामुळे केस धुल्यानंतर ते शॅम्पूसारखा रिजल्ट दिसणार नाही.
४) केस स्वच्छ करताना टाळू खूप जोरात घासू नका, नेहमी आपल्या केसांच्या टाईपनुसार केस धुण्यासाठी उत्पादनं निवडा.