केस धुतले की बाथरुममध्ये खूप केस गळून पडलेले दिसतात? ५ टिप्स- केस गळणार नाहीत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 12:42 PM 1 / 8केस धुतले की खूपच गळतात, असा खूप जणींचा अनुभव आहे. नाहल्यानंतर बाथरुमच्या फरशीवर एवढे केस गळून पडलेले दिसतात की ते पाहून मग अनेक जणींना केस धुणेच नकोसे वाटते.2 / 8तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर केस धुण्यापुर्वी हे काही उपाय करून पाहा. केस धुतल्यानंतर ते गळण्याचं प्रमाण खूप कमी होईल.3 / 8सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केस धुण्याआधी आपण त्यांना तेल लावतो. तेल लावताना काही जणी केसांच्या मुळाशी खूप खसाखस चोळतात. असं केल्याने केसांची मुळं दुखावतात आणि केस तुटतात. त्यामुळे केसांना हलक्या हाताने तेल लावा.4 / 8दुसरं म्हणजे केसांना नेहमी कोमट तेल लावावे. थंड तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करू नये. 5 / 8केसांना तेल लावल्यानंतर काही जणी आंबाडा घालून ते खूप घट्ट आवळून बांधतात. आधीच केसांची मुळं नाजूक झालेली असतात. त्यात असा घट्ट आंबाडा घातला तर केस मुळापासूनच तुटून जातात. त्यामुळे केस घट्ट बांधून ठेवू नका.6 / 8केस धुण्यासाठी नेहमी सॉफ्ट शाम्पू वापरावा. तसेच डोक्याच्या त्वचेवर शाम्पू खूप रगडून रगडून चोळू नये. शाम्पूही नेहमी हलक्या हाताने लावावा.7 / 8 केस धुण्यासाठी कडक, गरम पाणी वापरू नये. केस नेहमीच थंड किंवा कोमट पाण्याने धुवावे.8 / 8हे उपाय करून पाहा. केस धुतल्यानंतर ते गळण्याचं प्रमाण खूप कमी होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications