Low Cost Necklace Designs : फक्त ३०० रूपयात घ्या आकर्षक नेकलेस सेट; साडी, ड्रेस कशावरही ट्राय करू शकता लेटेस्ट पॅटर्न्स Published:May 20, 2022 03:48 PM 2022-05-20T15:48:13+5:30 2022-05-20T17:39:16+5:30
Low Cost Necklace Designs : कोणत्याही खास प्रसंगी हे नेकलेस घातल्यावर तुम्हाला इंडीयन लूक मिळेल. हा ज्वेलरी सेट एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे. नेहमीच एखाद्या समारंभाला किंवा लग्नाला जाण्यासाठी, पार्टीला जाण्यासाठी ड्रेसअप करताना छानसा नेकलेस घालण्याची इच्छा होते. नेकलेससाठी जास्त पैसे खर्च करण्याची काही गरज नाही. कमी बजेटमध्ये तुम्ही हवेतसे आकर्षक नेकलेस खरेदी करू शकता. (Low cost necklace designs) या लेखात तुम्हाला काही नेकलेस डिजाईन्स दाखवणार आहोत. (Latest Necklace Designs)
कोणत्याही खास प्रसंगी हे नेकलेस घातल्यावर तुम्हाला इंडीयन लूक मिळेल. हा ज्वेलरी सेट एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला ऑनलाइन उपलब्ध साईट्सच्या माध्यमातून मिळेल.
लग्नात सुंदर दिसायचे असेल तर साडीसोबत मॅचिंग ज्वेलरी सेट असणे आवश्यक आहे. आता लग्नासाठी मूळ सोन्याच्या दागिन्यांचा सेट खूप महाग होणार आहे. पण हा सुंदर नेकलेस सेट परिधान करून तुम्ही पारंपारिक आणि आकर्षक लुक मिळवू शकता.
काठापदराच्या साड्यांवर गोल्डन नेकलेस सेट अगदी खुलून दिसतो.
या ज्वेलरी सेटमध्ये तुम्हाला नेकलेसबरोबर कानातले आणि बिंदीयासुद्धा मिळते.
वन पीस, डंगरी, शॉर्ट जिन्स टॉप अशा कोणत्याही वेस्टर्न आऊटफिटवर तुम्ही या प्रकारचे नेकलेस घालू शकता.
तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसेल तर या टाईपचा नेकलेस घालू शकता.
हे नेकलेस लवकर काळे पडून नये म्हणून वापर झाल्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा.
कुर्ता किंवा लाँग वनपीसवर तुम्ही हे नवीन पॅटर्न ट्राय करू शकता.