Join us   

रोज प्या 'हे' जादुई पाणी! चेहऱ्यावर एवढा ग्लो येईल की फेशियल, ब्लीच करावंच लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 12:31 PM

1 / 8
आहारातून पुरेसे पोषण न मिळणे, प्रदुषण, धूळ, ऊन या सगळ्यांचा परिणाम आपल्या त्वचेवर होतोच. त्यामुळे मग त्वचेच्या अनेक समस्या दिसून येतात.
2 / 8
पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन, त्वचेवर ग्लो नसणे, त्वचा ड्राय होणे असे अनेक त्रास अनेक जणांमध्ये पाहायला मिळतात. या त्रासांवर वरवरचा उपाय करण्यापेक्षा आतून शरीर शुद्ध करा. शरीराला उत्तम पोषण द्या जेणेकरून त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल आणि मग त्वचा छान चमकेल.
3 / 8
हे सगळं कसं करायचं याविषयीचा उपाय ब्यूटी एक्सपर्टने rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामुळे त्वचा तर सुंदर, चमकदार होईलच पण आरोग्यालाही अनेक फायदे होतील.
4 / 8
यासाठी आपल्याला रात्री झोपण्यापुर्वी १ टेबलस्पून मनुका १ ग्लास पाण्यात भिजत घालायच्या आहेत. सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी हे पाणी प्यायचे आणि मनुका खायच्या. यामुळे रक्तशुद्धी होतेे आणि त्याचा आपल्या त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येतो.
5 / 8
शरीर नैसर्गिकपणे डिटॉक्स करण्यासाठी हा उपाय अतिशय उत्तम आहे. यामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत होते
6 / 8
वेटलॉससाठी देखील हा उपाय उत्तम मानला जातो. कारण यामुळे पचनशक्ती चांगली होते आणि त्यामुळे आपोआपच चयापचय क्रिया उत्तम होऊन शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
7 / 8
मनुकांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते. जे तुमच्या डोळ्यांसाठी चांगले असते. केसांसाठी आणि त्वचेसाठीही उत्तम असते. शिवाय यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
8 / 8
मनुकांमधील पौष्टिक घटकांमुळे त्वचेचा टाईटनेस टिकून राहतो. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येत नाहीत.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजीवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स