लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पारंपरिक लूक करून खुलवा तुमचं सौंदर्य!! मराठी अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 11:11 AM 1 / 7लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ट्रॅडिशनल लुक करायचा आहे पण त्यासाठी साडी कशी नेसावी, त्यावर दागिने कोणते घालावेत, हेअर स्टाईल कशी असावी? याबाबतीत बऱ्याच जणी गोंधळून जातात. काय करावं, काय करू नये, हे पटकन लक्षात येत नाही (laxmi puja 2024). म्हणूनच थोडी आयडिया येण्यासाठी मराठी अभिनेत्रींचे हे काही सुंदर दिवाळी लूक बघा.. पारंपरिक पद्धतीने कसं नटावं, याच्या छान टिप्स मिळतील..2 / 7केसांचा अंबाडा किंवा हेअरबन घालणार असाल तर असे मोठे झुमके घाला. झुमके घातल्यानंतर गळ्यातला दागिना छोटासाच हवा. मोठ्या झुमक्यांवर जास्त मोठे गळ्यातले शोभून दिसणार नाहीत.3 / 7नऊवारी नेसायचा विचार असेल तर त्यावर घालण्यासाठी पारंपरिक दागिन्यांचीच निवड करा. कारण नऊवारीचा लूक परफेक्ट करायचा असेल तर त्याला आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांचीच जोड हवी. 4 / 7एकदम टिपिकल लूक नको असेल, तर तुमच्या लूकला थोडा मॉडर्न टच देण्यासाठी अशा पद्धतीची वेगळी हेअर स्टाईल आणि ट्रेंडी दागदागिन्यांची निवड करू शकता.5 / 7मोत्याचे दागिने नेहमीच खूप सुरेख दिसतात. काठपदर साडी नेसणार असाल तर अशा पद्धतीचे नाजूक दागिने घालू शकता. 6 / 7दागिन्यांमध्ये थोडासा बदल केला तरी तुमचा पारंपारिक लूक कसा अधिक देखणा होऊ शकतो, याचं हे एक छानसं उदाहरण पाहा. अशा पद्धतीचं एखादं ठसठशीत गळ्यातलं काठपदर साडीवर ट्राय करून बघायला हरकत नाही. 7 / 7अगदी साधा लूक असला तरी त्यात एक वेगळाच गोडवा आणि आकर्षकपणा आहे. यासाठी दागिन्यांची निवड आणि हेअर स्टाईल मात्र परफेक्ट जमायला हवी. आणखी वाचा Subscribe to Notifications