धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट?

Published:May 24, 2023 05:46 PM2023-05-24T17:46:55+5:302023-05-24T17:55:26+5:30

Maleesha Kharwa 14 Year Old Girl From Dharavi Became The Face of Luxury Brand : स्वप्न पाहणं ही काही कुणाची मक्तेदारी नाही, टॅलण्ट असेल तर स्वप्न पूर्ण होतात, बेघर लहान मुलीचं झालं तसं..

धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट?

मॉडेल व्हायचं स्वप्न पाहणारे अनेक असतात. पण ते काही सोपे काम नाही, काहींचे हे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे हे स्वप्न कायम स्वप्नच राहते (Maleesha Kharwa 14 Year Old Girl From Dharavi Became The Face of Luxury Brand ).

धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट?

जगात प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील धारावीमध्ये राहणाऱ्या एका लहानगीनेही हे स्वप्न पाहिले. कोणतीही पार्श्वभूमी नसताना या मुलीने आपले हे स्वप्न पूर्णही करुन दाखवले.

धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट?

भल्या भल्यांना जमले नाही ते या वस्तीत राहणाऱ्या मुलीने शक्य करुन दाखवले. अवघ्या १४ वर्षांच्या मुलीने थेट हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आपल्यातील कसब दाखवून दिले.

धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट?

१४ वर्षांची ही मुलगी सोशल मीडियावर ‘स्लम प्रिन्सेस’ म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर The Princes from The Slum या हॅशटॅगचा वापर करुन ती आपले फोटो आणि वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट?

लिव्ह युअर फेअरीटेल या शॉर्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या मालिशाने ‘द युवती सिलेक्शन’ या सेल्फ केअर ब्रँडसोबत काम केले आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट?

मालिशा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे २ लाख ३५ हजार फॉलोअर्स आहेत. एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड अॅम्बेसिडर असणे ही वस्तीतील तरुणींसाठी आशादायक बाब आहे.

धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट?

२०२० मध्ये हॉलिवूडचा अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन मालिशाला भेटला आणि त्याने मालिशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फंड रेजिंग करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने सुरू केलेल्या पेजवर तिच्यासमोर असणाऱ्या आव्हानांबाबत माहिती दिली.