1 / 7मंगळागौर पूजन हे श्रावणातलं एक मोठं थाटामाटात केलं जाणारं व्रत. लग्नानंतर नवविवाहिता हे व्रत करते. तिच्या सारख्याच नविन लग्न झालेल्या आजुबाजुच्या ४- ५ नवविवाहितांना बोलावून हे व्रत केलं जातं. मराठी सेलिब्रिटीही मोठ्या हौशीने मंगळागौरीची पूजा करताना दिसत आहेत. बघा त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात त्यांनी कशा पद्धतीने मंगळागौर साजरी केली...2 / 7स्वानंदी टिकेकर हिची ही पहिलीच मंगळागौर. त्यासाठी तिने केलेला हा लूक अतिशय देखणा होता. जांभळी पैठणी आणि त्यावर गुलाबी ब्लाऊज, नाकात ठसकेबाज नथ आणि केसांचा छानसा अंबाडा. यामुळे स्वानंदी अतिशय मोहक दिसत होती. (Swanandi Tikekar)3 / 7महाराष्ट्राची लाडकी गायिका मुग्धा वैशंपायन हिनेसुद्धा यावर्षी लग्नानंतर तिची पाहिली मंगळागौर साजरी केली. तिचा हा साधा- गोड लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडून गेला. (Mugdha Vaishampayan)4 / 7छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अमृता बने ही सुद्धा अशा सुंदर पारंपरिक पद्धतीने तिच्या मंगळागौरीसाठी तयार झाली होती. (Amruta Bane)5 / 7पाठकबाई म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री अक्षया देवधर हिने मंगळागौरीसाठी अगदी हातभरून मेहेंदी काढली होती. मोतिया रंगाची साडी नेसून ती तिच्या मंगळागौरीसाठी तयार झाली होती. (Akshaya Deodhar)6 / 7सई लोकूरने सुद्धा दोन वर्षांपुर्वी मोठ्या हौशीने तिची मंगळागौरी साजरी केली होेती. त्यावेळी अशी हिरवी साडी नेसून तिने पारंपरिक लूकला थोडा मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केला होता. (Saee Lokur)7 / 7अभिनेत्री अभिज्ञा भावेने मागच्यावर्षी तिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातली पहिली मंगळागौर साजरी केली. यावेळी बघा ती कशी छान तयार झाली होती. (Abhidnya Bhave)