नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

Published:August 1, 2022 04:56 PM2022-08-01T16:56:29+5:302022-08-01T17:02:19+5:30

Mehendi Heena Designes For Nagpanchami Special : संस्कृती जपणारी मेहेंदीची परंपरा, पाहा एक से एक डिझाइन्स

नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

नागपंचमी म्हटली की हातावर मेहेंदी, नवीन बांगड्या आणि इतर दागिने हे आलेच. श्रावणातील पहिला सण म्हणून ओळखली जाणारी नागपंचमी साजरी करताना हातावर मेहेंदी काढण्याची परंपरा आजही जपली जाते. धकाधकीच्या जीवनात मेहेंदी काढायला सुचत नसेल तर पाहा मेहेंदीच्या सोप्या डिझाइन्स...(Mehendi Heena Designes For Nagpanchami Special).

नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

अरेबिक मेहेंदी, कलरफूल मेहेंदी, झटपट रंगणारी मेहेंदी असे कितीही नवीन प्रकार बाजारात आले असले तरी पारंपरिक भरगच्च मेहेंदीची सर इतर कोणत्याच प्रकाराला नाही. एक उत्तम कला म्हणून ओळखली जाणारी ही मेहेंदी काढायला वेळ लागत असला तरी ती हातावर रंग ल्याली की त्याची सर कशालाच येत नाही. स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालणारी ही मेहेंदी नागपंचमीला आवर्जून काढली जाते.

नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

पूर्वीच्या काळी घरातील बहिणी, शेजारपाजारच्या मैत्रिणी, घरातील वरीष्ठ महिला, लहान मुली अशा सगळ्या मिळून मेहेंदी काढायचा कार्यक्रम असे. रात्रीच्या वेळी अंगणात गप्पा मारत, हसत-खेळत हा कार्यक्रम नागपंचमीच्या आदल्या रात्री रंगत असे.

नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

आपल्याला फार भरगच्च किंवा कल्पकता वापरुन मेहेंदी काढता येत नसेल तरी अगदी सोप्या आणि सहज अशा काही ट्रीक वापरुन आपण हात मेहेंदीने सजवू शकतो. त्यासाठी किमान आयडीया मिळणे आवश्यक आहे इतकेच.

नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

फार नाजूक किंवा बारीक मेहेंदी काढण्यापेक्षा मोठी आणि जाड मेहेंदी काढली तर ती रंगल्यावर सुंदर दिसते.

नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

थोडी हटके आणि सगळ्यांपेक्षा वेगळी मेहेंदी हवी असेल तर असं काहीतरी तुम्ही नक्की ट्राय करु शकता. यामुळे हात भरलेलाही दिसतो आणि अशाप्रकारच्या डिझाइन्स काढायला वेळही कमी लागतो.

नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

हाताच्या पुढच्या आणि मागच्या बाजुला आपण नेहमीच मेहेंदी काढतो. पण हाताच्या मागच्या बाजूला बोटांवर आणि अशी एका कोपऱ्यात कधी मेहेंदी ट्राय केलीये? तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं असेल तर अशी मेहेंदी एकदा नक्की ट्राय करुन पाहा.

नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

साखरपुडा, लग्न किंवा आणखी कोणत्या प्रसंगी आपण दोन्ही हात जोडल्यावर तयार होईल अशी मेहेंदी काढतो. त्याचप्रमाणे नागपंचमी किंवा इतर कोणत्या सणाला आपल्याला अशी मेहेंदी हवी असेल तर जाळीची ही मेहंदी हा अगदी सोपा पर्याय असतो.

नागपंचमीला हातावर मेहेंदी तर हवीच! मेहेंदीच्या सोप्या-सुंदर आणि झटपट काढता येतील अशा डिझाइन्स...

परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी मेहेंदी काढली जाते हे जरी खरे असले तरी आपल्याकडे ती कला असेलच असे नाही. अशावेळी एखादी साधीशी मेहंदीही आपल्या हाताचे सौंदर्य नक्कीच खुलवू शकते.