Join us   

Diwali 2024: कोणालाही सहज काढता येतील अशा लेटेस्ट फॅशनच्या ८ सोप्या- सुंदर मेहेंदी डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 4:22 PM

1 / 9
हातांवर मेहेंदी लावण्याची अनेकींना भारी हौस असते. पण एरवी इतर सणांना मेहेंदी लावणं होत नाही. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने मात्र जवळपास सगळ्याच जणी हातावर जमेल तशी मेहेंदी काढतातच (mehndi designs for diwali). तुम्हालाही दिवाळीत हातावर कमी वेळात होणारी आकर्षक मेहेंदी काढायची असेल तर हे काही लेटेस्ट सोपे मेहेंदी पॅटर्न बघा.(8 most simple and attractive mehndi designs for diwali)
2 / 9
पुर्वी हातभर मेहेंदी काढण्याची फॅशन होती. त्याच्यानंतर अरेबियन स्टाईल मेहेंदीची फॅशन सुरू झाली. यामध्ये तळहाताच्या एका कोपऱ्यापासून मेहेंदी सुरू व्हायची आणि कोणत्यातरी एका बोटावर जाऊन थांबायची. आता मात्र अशा पद्धतीच्या मेहेंदीची क्रेझ आहे. यामध्ये पारंपरिक मेहेंदीसारखा हात पुर्णपणे भरतही नाही आणि अरेबियन मेहेंदीसारखा रिकामाही वाटत नाही. (latest trendy mehndi designs)
3 / 9
ही एक अतिशय सुंदर, नाजूक डिझाईन पाहा.. ही मेहेंदी काढण्यासाठी कोनाचे पुढचे टोक अगदी बारीक ठेवा. कारण त्याशिवाय एवढ्या नजाकतीने नक्षी येणार नाहीत.
4 / 9
हा एक आणखी आकर्षक प्रकार. सण संपल्यानंतर हातभर रंगलेली मेहेंदी लावून ऑफिसला जायला नकोसे वाटते. अशा वर्किंग वुमनने अशी मेहेंदी काढायला हरकत नाही.
5 / 9
ही डिझाईन सध्या खूप ट्रेण्डिंग आहे. तुम्ही जर बारकाईने निरिक्षण केलं असेल तर नुकत्याच लग्न झालेल्या काही सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नात किंवा आताच दोन दिवसांपुर्वी झालेल्या करवाचौथ सणाला देखील अशाच पद्धतीची मेहेंदी काढली होती.
6 / 9
मेहेंदीचा हा प्रकारही सध्या खूप ट्रेण्डिंग आहे. मागच्या हातावर अनेक जणींना खूप जाड, मोठी नक्षी असणारी मेहेंदी आवडत नाही. अशावेळी तुम्ही ही डिझाईन ट्राय करून पाहू शकता. ही मेहेंदी तुम्ही पुढच्या हातावर काढली तरी चाल
7 / 9
तुम्हाला अरेबियन प्रकारातली मेहेंदी आवडत असेल तर ही एक डिझाईन छान आहे. कमीत कमी वेळेत अगदी झटपट काढून होईल. शिवाय रंगल्यावर खूप छान दिसेल.
8 / 9
ही मेहेंदी काढायला अतिशय सोपी आहे. शिवाय हात भरून दिसणारी आहे. त्यामुळे कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त मेहेंदी काढायची असेल तर हे डिझाईन उत्तम आहे.
9 / 9
टॅग्स : दिवाळी 2024फॅशन