९० टक्के लोक 'इथे' चुकतात, म्हणूनच तर केस गळून पातळ होतात, बघा तुम्हीही तेच करता का? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2024 9:03 AM 1 / 9हल्ली असं झालं आहे की बहुतांश लोकांचे केस खूप गळत आहेत. पुरेसा आहार घेऊन, केसांसाठी योग्य कॉस्मेटिक्स वापरूनही केस म्हणावे तसे वाढत नाहीत. उलट आणखीनच गळतात.2 / 9याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बहुतांश लोक केसांच्या बाबतीत काही चूका वारंवार करतात. त्याचा केसांवर परिणाम होत जातो आणि मग केस गळून गळून खूपच पातळ होतात. अकाली पांढरे दिसू लागतात. त्या चुका कोणत्या ते पाहा..3 / 9केसांचं ट्रिमिंग नियमितपणे न करणे. यामुळे केसांना फाटे फुटून ते कोरडे, रुक्ष होतात.4 / 9नेहमीच गरम पाण्याने केस धुणे. केस धुण्यासाठी नेहमी थंड, कोमट पाणी वापरावं.5 / 9ओले केस खूप खसाखस पुसणे आणि जोर लावून विंचरणे.6 / 9नेहमीच केस खूप घट्ट बांधून ठेवणे.7 / 9केसांसाठी चुकीचे कॉस्मेटिक्स आणि कंगवा वापरणे. सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला न घेता वारंवार कॉस्मेटिक्स बदलत राहणे. 8 / 9वारंवार केस धुणे तसेच शाम्पू केल्यानंतर कंडिशनरचा वापर न करणे. 9 / 9आहाराकडे दुर्लक्ष करणे. केसांसाठी पोषक असणारे पदार्थ आहारातून न घेणे. आणखी वाचा Subscribe to Notifications