Lipstick Day 2022 : कशी निवडाल परफेक्ट लिपस्टिक? ३ टिप्स, ऑफिससाठी निवडा योग्य शेड..

Published:July 29, 2022 12:44 PM2022-07-29T12:44:07+5:302022-07-29T13:15:59+5:30

National Lipstick Day 2022 : लिपस्टिकचा प्रत्येक रंग सगळ्यांनाच शोभेल असे नाही. यासाठी त्वचेच्या रंगाकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे

Lipstick Day 2022 : कशी निवडाल परफेक्ट लिपस्टिक? ३ टिप्स, ऑफिससाठी निवडा योग्य शेड..

रोज कामासाठी बाहेर पडताना आपण सुंदर, प्रेझेंटेबल दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी महिला महागडी उत्पादनं म्हणजेच लिपस्टिक, कॉम्पॅक्ट, मस्कारा.. इत्यादी विकत घेतात. पण एवढं सगळं करूनही हवातसा लूक येत नाही. जेव्हा महिला बाजारात लिपस्टिक घेण्यासाठी जातात तेव्हा अनेक शेड्स पाहून गोंधळून जातात. (How to Choose the Right Lipstick for You) सर्व छटा एकापेक्षा एक दिसतात आणि कोणती शेड स्वतःसाठी योग्य असेल हे समजत नाही.

Lipstick Day 2022 : कशी निवडाल परफेक्ट लिपस्टिक? ३ टिप्स, ऑफिससाठी निवडा योग्य शेड..

या गोंधळात अनेक वेळा स्त्रिया स्टाईलबाहेर कुठलीही शेड विकत घेतात, पण ती शेड ओठांवर लावल्यानंतर चेहरा निस्तेज दिसू लागतो किंवा रंग गडद दिसू लागतो. (How to choose lipstick for your skin tone)

Lipstick Day 2022 : कशी निवडाल परफेक्ट लिपस्टिक? ३ टिप्स, ऑफिससाठी निवडा योग्य शेड..

स्वतःच्या त्वचेच्या टोनची नीट माहिती नसल्यामुळे असे घडते. लिपस्टिकचा प्रत्येक रंग सगळ्यांनाच शोभेल असे नाही. यासाठी त्वचेच्या रंगाकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. स्किन टोननुसार परफेक्ट लिपस्टिक शेड्स कसे निवडायचे ते माहित करून घेऊया.(How to Find the Perfect Lipstick Shade for Your Skin Tone)

Lipstick Day 2022 : कशी निवडाल परफेक्ट लिपस्टिक? ३ टिप्स, ऑफिससाठी निवडा योग्य शेड..

जर तुमचा रंग खूप गोरा असेल तर लिपस्टिकच्या अनेक शेड्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. लाइट पिंक, वाइन रेड, लाइट पर्पल, कोरल, पीच, न्‍यूड पिंक हे रंग स्त्रियांना सूट करतात. परंतु त्यांनी गडद गुलाबी, रक्त लाल आणि जास्त चमकणारे किंवा चकचकीत दिसणारे शेड्स टाळावेत.

Lipstick Day 2022 : कशी निवडाल परफेक्ट लिपस्टिक? ३ टिप्स, ऑफिससाठी निवडा योग्य शेड..

जर तुमचा रंग गव्हासारखा असेल, म्हणजे गडद किंवा फारसा गोरा नाही, तर तुम्ही न्यूड शेड्स टाळाव्या कारण ते तुमच्या चेहऱ्याचा रंग फिकट करू शकतात. तपकिरी रंगाच्या छटा अशा स्त्रियांना योग्य दिसतात. याशिवाय, तुम्ही डार्क पिंक, ब्लड रेड, ब्रोज, राइप ऑरेंज, सिनामन कलर देखील निवडू शकता. पण मरून, केशरी आणि गडद कॉफी रंग टाळा.

Lipstick Day 2022 : कशी निवडाल परफेक्ट लिपस्टिक? ३ टिप्स, ऑफिससाठी निवडा योग्य शेड..

जर तुमचा रंग गडद असेल तर तुम्ही लिपस्टिक लाल, तपकिरी लाल आणि कारमेल रंग, कॉफी आणि बरगंडी रंग वापरून पाहा. पण फक्त मॅट लिपस्टिकच्या शेड्स निवडा, ग्लॉसी नाही. चकचकीत रंगांमुळे तुमच्या त्वचेचा रंग गडद दिसतो. दुसरीकडे, जर तुमचा रंग जास्त गडद असेल तर तुम्ही स्वतःसाठी ब्राउन, रेड, पर्पल कलर निवडू शकता. याशिवाय पेस्टल शेड्स जसं की लाइट पर्पल, लाइट पिंक, लेवेंडर हे कलर्स लावू शकता.

Lipstick Day 2022 : कशी निवडाल परफेक्ट लिपस्टिक? ३ टिप्स, ऑफिससाठी निवडा योग्य शेड..

त्वचेच्या टोननुसार योग्य शेड निवडल्यानंतर, सर्वप्रथम ओठांवर लिप बाम लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. यानंतर, लाइट प्राइमर किंवा फाउंडेशन लावा जेणेकरून लिपस्टिक ओठांवर बराच काळ टिकेल. लिपस्टिकला मॅचिंग लिप लाइनरने ओठांना छान आकार द्या. त्यानंतर ब्रशच्या मदतीने ओठांवर लिपस्टिक लावा. तुम्ही लिपस्टिक ब्रशचाही वापर करू शकता.