विसरा महागडे डिओ आणि परफ्यूम्स! 'हे' ५ नैसर्गिक पदार्थ घामाची दुर्गंधी करतात दूर, मंद सुगंधाने वाटेल फ्रेश...
Updated:April 18, 2025 14:45 IST2025-04-17T23:34:36+5:302025-04-18T14:45:01+5:30
If You Are Troubled By The Smell Of Sweat In Summer Then Try These Home Remedies : Natural home remedies for body odour : How to Stop Sweating Naturally : How to Handle Sweaty Armpits : How to get rid of bad body odour Try these amazing home remedies : उन्हाळ्यात सतत येणारी घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी करुन पाहा हे नॅचरल उपाय...

उन्हाळ्यात आपल्या अंगाला सतत प्रचंड घाम येतो. काहीवेळा तर घामाने (If You Are Troubled By The Smell Of Sweat In Summer Then Try These Home Remedies) आपले संपूर्ण शरीर भिजून जाते. हा घाम दीर्घकाळ अंगावर साचून काहीवेळाने त्याची दुर्गंधी येऊ लागते. अंगाला येणारी घामाची दुर्गंधी नकोशी वाटणारी असते. याचबरोबर, या घामाच्या दुर्गंधीने काहीवेळा चारचौघात ओशाळल्यासारखे वाटते.
यासाठीच, केमिकल्सयुक्त - रासायनिक परफ्यूम, डिओ, स्प्रेचा (Natural home remedies for body odour) वापर करण्यापेक्षा आपण काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो. ज्यामुळे शरीरातून येणारी घामाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
शरीराला येणारी घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी (How to Stop Sweating Naturally) कोणकोणत्या नैसर्गिक पदार्थांचा आपण वापर करु शकतो, ते पाहूयात.
१. लिंबू :-
लिंबाच्या रसात असलेले सायट्रिक अॅसिड बॅक्टेरिया नष्ट करते, ज्यामुळे घामाचा दुर्गंध कमी होतो. यासाठी तुम्ही लिंबाचा रस थेट अंडरआर्म्सवर किंवा आंघोळीच्या पाण्यात मिसळून देखील वापरू शकता.
२. खोबरेल तेल :-
खोबरेल तेलात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म घामामुळे येणारे दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी, खोबरेल तेल लावा आणि शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येतो त्या भागांना खोबरेल तेलाने हलके मालिश करा.
३. कडूलिंब :-
कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म घामातून दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करतात. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्याने घामाचा दुर्गंध दूर होतो.
४. बटाटा :-
बटाटा हे एक नैसर्गिक क्लिंजर आहे जे त्वचेतील अशुद्धता काढून टाकते. यासाठी कच्चा बटाटा बरोबर मध्यभागी अर्धा कापून थेट घाम येणाऱ्या भागावर घासल्याने घामाचा दुर्गंध दूर होतो.
५. सैंधव मीठ :-
मीठामध्ये असलेले शुद्धीकरणाचे गुणधर्म त्वचेच्या पृष्ठभागावर राहणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा नायनाट करुन घाम आणि त्याचा दुर्गंधी दूर करतात. यासाठी रोज कोमट पाण्यात सैंधव मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे. या पाण्याने आंघोळ केल्याने घामाचा दुर्गंध दूर होऊ शकतो.