केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा ‘हे’ छोटेसे बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

Published:August 1, 2024 12:18 PM2024-08-01T12:18:45+5:302024-08-01T17:25:30+5:30

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा ‘हे’ छोटेसे बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

केस गळण्याच्या समस्येने अनेक जण सध्या हैराण आहेत. बऱ्याच जणींनी तर केस गळून गळून शेपटीसारखे दिसतात म्हणून आता केस वाढवणंही थांबवलं आहे.(natural remedies for reducing hair fall)

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा ‘हे’ छोटेसे बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

केस गळणं कमी करण्यासाठी आपण वरवरचे अनेक उपाय करतो. पण त्याचा केसांना पाहिजे तसा फायदा होत नाही (how diet can help to control hair loss). म्हणूनच आता योग्य आहार घेऊन केसांना मजबूत करण्यासाठी योग्य पोषण कसं द्यायचं ते पाहूया.( diet tips for fast hair growth)

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा ‘हे’ छोटेसे बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

केसांची मुळं मजबूत करून त्यांच्या वाढीसाठी आणि गळणं कमी करण्यासाठी नेमके काय उपाय करावेत, कोणते पदार्थ आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात असावेत, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ amitagadre या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (best remedies for long and strong hair)

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा ‘हे’ छोटेसे बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

यामध्ये सांगितलेला पहिला पदार्थ आहे लोह. लोह आहारात पुरेशा प्रमाणात असेल तर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात मिळाल्यामुळे केसांची मुळं बळकट होतात. आणि आपोआपच केस गळणं कमी होतं. यासाठी पालक नियमितपणे खा.

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा ‘हे’ छोटेसे बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी उपयुक्त ठरणारा दुसरा पदार्थ आहे फॉलिक ॲसिड. हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळं आणि डाळींमधून फॉलिक ॲसिड मिळते.

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा ‘हे’ छोटेसे बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

केसांना मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी ३ देखील अतिशय गरजेचे आहे. यासाठी कोवळ्या सुर्यप्रकाशात जाऊन थोडा व्यायाम करा. यामुळे केस आणि तब्येत दोन्हींची काळजी घेतली जाईल. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधूनही व्हिटॅमिन डी ३ मिळते.

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा ‘हे’ छोटेसे बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ उपयुक्त ठरते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी ते देखील शरीरात पुरेशा प्रमाणात असणे गरजेचे आहे.

केस शेपटीसारखे पातळ झाले? खाण्यापिण्यामध्ये करा ‘हे’ छोटेसे बदल- केस गळणं कायमचं बंद होईल

ओमेगा ३ फॅटी ॲसिडमुळे केस गळणं भरपूर प्रमाणात कमी होतं. नविन केस उगवण्यास आणि त्यांची चांगली वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे अक्रोड आणि जवस नियमितपणे खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.