Join us   

नवरात्री 2022 : ९ दिवस- ९ रंग, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसाल? सेव्ह करा हा कलर चार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 1:54 PM

1 / 9
. यंदा नवरात्रीमध्ये (Navratri 2022) कोणत्या माळेचा काेणता रंग असणार, याची उत्सूकता बहुतांश महिलांना असते. म्हणूनच तर हे बघा यावर्षीचं नवरात्र स्पेशल रंगांचं कॅलेंडर.. पटापट बघा आणि नीट लक्षात ठेवा की कोणत्या रंगाची साडी कोणत्या दिवशी नेसायची..यंदाच्या नवरात्रोत्सवाची सुरुवातच शुभ्र पांढऱ्या रंगापासून होत आहे. शांतता आणि सौम्यता यांचं प्रतिक असलेला हा रंग नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच २६ सप्टेंबरला घाला.
2 / 9
नवरात्रीच्या दुसऱ्या माळेचा म्हणजेच २७ सप्टेंबरचा रंग आहे लाल. लाल रंगाच्या साडीमध्ये किंवा ड्रेस मध्ये कसा लूक करायचा, असा प्रश्न पडला असेल, तर बॉलीवूड अभिनेत्रींचे हे काही लूक बघाच.
3 / 9
२८ सप्टेंबर रोजी तिसऱ्या माळेला मस्त निळ्याशार रंगाचा ड्रेस घाला किंवा साडी नेसा. हा रंग विलक्षण मोहक असल्याने अनेकींचा आवडता असतो.
4 / 9
पिवळ्या रंगाची नजाकतही काही औरच असते. मग पिवळी साडी कॉटनची असो किंवा मग सिल्कची. ती नेसल्यावर चेहऱ्यावर वेगळाच ग्लो येतो, हे नक्की. चौथ्या माळेचा रंग आहे पिवळा..
5 / 9
हिरवा रंग आहे समृद्धीचं प्रतिक. म्हणूनच यंदाच्या नवरात्रीत पाचव्या माळेला म्हणजेच दि. ३० सप्टेंबर रोजी हिरव्या रंगातील वेशभुषा करायला विसरू नका.
6 / 9
सहाव्या माळेचा रंग आहे राखाडी. एरवी हा रंग सहजासहजी घेतला जात नाही. पण नवरात्रीसाठी लागतो, म्हणून अनेकजणी या रंगाची साडी किंवा ड्रेस हमखास आपल्या वार्डरोबमध्ये ठेवतात.
7 / 9
सातव्या माळेचा म्हणजेच दि. २ ऑक्टोबर रोजीचा रंग आहे केशरी किंवा भगवा. अनेकदा लाल रंग आणि केशरी रंग यात अनेक जणी गोंधळून जातात. या दोन्ही रंगांच्या छटा व्यवस्थित समजून घ्या आणि परफेक्ट केशरी रंग निवडा.
8 / 9
गुलाबी रंग असतोच काही खास.. ३ ऑक्टोबर रोजी असणाऱ्या आठव्या माळेचा रंग आहे गुलाबी. बेबी पिंकपासून राणी कलरपर्यंत अनेक रंगछटा या गुलाबी रंगात येतात.
9 / 9
मंगळवारच्या नवव्या आणि शेवटच्या माळेचा रंग आहे जांभळा. या रंगाच्या साड्यांची तयारी करा आणि यंदाच्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करा.
टॅग्स : ब्यूटी टिप्सफॅशननवरात्री