Join us

नवरात्र स्पेशल : पाहा सुंदर हेअरस्टाइल्स, फक्त ५ मिनिटांत करता येतील अशा सुंदर झटपट केशरचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2024 19:10 IST

1 / 7
नवरात्र म्हटले की आपण देवीला, एकमेकींकडे हळदीकुंकवाला, भोंडल्याला किंवा गरबा-दांडीया खेळायला आवर्जून जातो. त्यावेळी आपला लूक खुलून यावा यासाठी करता येतील अशा झटपट हेअरस्टाईल पाहूया (Navratri special easy hairstyle fashion tips)..
2 / 7
साडी नेसल्यावर किंवा घागरा घातल्यावर केस खांद्यावर मोकळे नको असतील तर आंबाडा किंवा बन हा उत्तम पर्याय ठरतो. त्यावर एखादे डेकोरेशन किंवा गजरा खुलून दिसतो.
3 / 7
तुमचे केस लहान असतील किंवा तुम्हाला त्याचा बन घालता येणे शक्य नसेल तर बाजारात मिळणारा मेसी बन तुम्ही आंबाड्यावर लावू शकता. त्यामुळे केसांचा व्हॉल्यूम जास्त दिसण्यास मदत होते. बाजारात विविध रंगांचे आकाराचे मस्त मेसी बन मिळतात.
4 / 7
केस पुढे यायला नको असतील आणि तरीही पूर्ण वरती बांधायचे नसतील तर बाजूच्या २ बटा घेऊन मध्यभागी छान हेअरस्टाईल करता येऊ शकेल.
5 / 7
वेणीची स्टाईल सध्या परत आली असून साधी तीन पेडी, पाच पेडी किंवा सागरवेणी असे वेणीचे विविध प्रकार ट्राय करु शकता. वेणीवर लावायला वेगवेगळ्या अॅक्सेसरीजही मिळतात.
6 / 7
साईड बन करायला सोपा आणि दिसायला आकर्षक असतो. त्यावर वेगवेगळी फुलं किंवा डेकोरेशन लावता येऊ शकतं.
7 / 7
हाय पोनीचा पॅटर्नही साडी किंवा ड्रेसवर छान दिसतो. केस कुरळे असतील तर त्यातही थोडी वेगळी फॅशन करता येते. नाहीतर साधा वरच्या बाजुला पोनी घालून पुढचे केस थोडे स्टाईल केले तर तुम्ही फॅशनेबल दिसू शकता.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२४ब्यूटी टिप्सफॅशनकेसांची काळजी