Join us

काळवंडलेली त्वचा चमकदार करणारा ऑरेंज फेसपॅक! संत्र्याचे साल फेकू नका,‘असे’ वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 16:17 IST

1 / 6
त्वचा काळवंडली असेल, त्वचेवर खूपच काळपट डाग किंवा पिगमेंटेशन दिसत असेल तर ते कमी करण्यासाठी संत्रीच्या सालीचा खूपच चांगला उपयोग करता येतो.
2 / 6
संत्रीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेवरचे काळपट डाग कमी करून त्वचा नितळ, स्वच्छ करण्यासाठी संत्रीचे साल खूप उपयुक्त ठरते. डेड स्किन काढून टाकण्यासाठीही संत्रीच्या सालीचा उपयोग होतो. तो नेमका कसा करावा याची माहिती roundchilli या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
3 / 6
हा उपाय करण्यासाठी संत्रीच्या सालीचे बारीक तुकडे करा आणि थोडंसं कच्चं दूध घालून त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.
4 / 6
त्यानंतर ती पेस्ट एका वाटीमध्ये काढा. त्यामध्ये १ चमचा तांदळाचे पीठ आणि १ चमचा मध टाका.
5 / 6
सगळं व्यवस्थित हलवून घ्या आणि हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा. हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा.
6 / 6
१० ते १५ मिनिटे लेप तसाच चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर धुवून टाका. चेहरा छान उजळ, मुलायम झालेला दिसेल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी