Join us

पिग्मेंटेशन-डागांमुळे चेहरा वयस्कर दिसतो? किचनमधल्या २ गोष्टी लावा; चेहऱ्यावर येईल तेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:36 IST

1 / 7
पिग्मेंटेशन येणं हे खूपच सामान्य आहे. विशिष्ट वयानंतर चेहऱ्याववर वेगवेगळ्या प्रकारचे बदल दिसायला सुरूवात होते. एजिंग साईन्स कमी करण्यासाठी बजारात बऱ्याच क्रिम्स उपलब्ध आहेत. पण सर्वच क्रिम्स त्वचेसाठी फायदेशीर ठरतील असं नाही.
2 / 7
स्वच्छ, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही पिग्मेंटेशनची ट्रिटमेंट करू शकता. कोणत्या पदार्थांच्या मदतीने पिग्मेंटेशन दूर करता येतं ते समजून घेऊ.
3 / 7
काकडीतील एंटी ऑक्सिडेंटस् त्वचेला मॉईश्चराईज करतात. यातील तत्व त्वचेला डिप क्लिनिंग करण्याचे काम करतात. याशिवाय यातील मिनरलस, एंटी ऑक्सिडेंट् तत्व चेहऱ्यावरील पोर्सची साईज वाढवण्यापासून रोखतात. त्वचेवर ग्लो आणण्यासाठी काकडीसुद्धा फायदेशीर ठरते.
4 / 7
दही त्वचेवर दिसणाऱ्या एजिंग साईन्स रोखण्यास मदत करते. याचा वापर नियमित चेहऱ्यावर केल्यास त्वचा सुंदर आणि तरूण दिसण्यास मदत होते.
5 / 7
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये १ काकडी बारीक वाटून घ्या. यात २ चमचे दही घालून व्यवस्थित मिसळून घ्या. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून चेहऱ्याला हा पॅक लावा.
6 / 7
१५ मिनिटांनंतर चेहऱ्याला हा पॅक लावून चेहरा साफ करून घ्या. ज्यामुळे चेहऱ्याचा काळेपणा कमी होईल.
7 / 7
आठवड्यातून ३ वेळा हा उपाय तुम्ही करू शकता. यामुळे त्वचेची काळजी घेता येते आणि त्वचेच्या समस्या हळूहळू कमी होतात.
टॅग्स : त्वचेची काळजीब्यूटी टिप्स