priyanka chopra's hair care and skin care tips, how to use castor oil for hair and skin
प्रियांका चोप्रासारखी सुंदर चमकदार त्वचा-दाट केस हवेत? करा तिच्या आईने सांगितलेला उपायPublished:September 28, 2024 02:57 PM2024-09-28T14:57:41+5:302024-09-28T15:12:15+5:30Join usJoin usNext अभिनेत्री प्रियांका चोप्रासारखी सुंदर चमकदार त्वचा आणि तिच्यासारखे दाट- काळेभोर केस पाहिजे असतील तर तिच्या आईने सांगितलेला हा उपाय करून पाहा... प्रियांका चोप्राच्या आई म्हणजेच डॉ. मधू चोप्रा यांनी इंस्टाग्रामवर त्यांच्या खास स्किन केअर टिप्स आणि हेअर केअर टिप्स शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी केसांसाठी आणि त्वचेसाठी कॅस्टर ऑईलचा एका खास पद्धतीने वापर करायला सांगितला आहे. त्या म्हणाल्या की हातावर थोडेसे कॅस्टर ऑईल घ्या. ते जेवढे घेतले असेल तेवढ्याच प्रमाणात त्यात बदामाचे तेल किंवा खोबरेल तेल मिसळा. दोन्ही तेल व्यवस्थित एकत्र करा आणि ते तुमच्या चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर हे तेल तुमच्या चेहऱ्यावर तसेच राहू द्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास पिगमेंटेशन बऱ्याच प्रमाणात कमी होते वरील उपाय नियमितपणे केल्यास त्वचेचा लवचिकपणा टिकून राहण्यास मदत होईल. त्यामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या किंवा फाईन लाईन्स दिसणार नाहीत. कॅस्टर ऑईल आणि आर्गन ऑईल किंवा खोबरेल तेल मिक्स करून केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होऊन ते दाट आणि लांब होण्यास मदत होईल. कॅस्टर ऑईल थोडे घट्ट आणि चिकट असते. त्यामुळे ते केसांमधून काढून टाकायला थोडा जास्त शाम्पू वापरावा लागेल. पण त्याचा केसांवर मात्र खूपच छान परिणाम दिसून येईल. केस चमकदार आणि सिल्की दिसतील. भुवयांचे केस पातळ झाले असतील तर कॅस्टर ऑईल आणि खोबरेल तेल एकत्र करून भुवयांना मसाज करा. भुवयांची चांगली वाढ होऊन त्या दाट काळ्याभोर होतील.टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजीहोम रेमेडीप्रियंका चोप्राBeauty TipsSkin Care TipsHair Care TipsHome remedyPriyanka Chopra