प्रियांका चोप्रासारखी चमकदार त्वचा पाहिजे? तिचा सगळ्यात आवडीचा स्वस्तात मस्त बॉडी स्क्रब वापरा
Updated:December 25, 2024 16:42 IST2024-12-25T16:27:12+5:302024-12-25T16:42:26+5:30

प्रियांका चोप्रा आज हॉलीवूड स्टार झालेली असली तरी काही काही बाबतीत मात्र ती पुर्णपणे देसी गर्ल आहे (Priyanka Chopra's most favourite body scrub). आजही भारतातल्या लाखो स्त्रियांप्रमाणेच ती काही घरगुती सौंदर्योपचार करत असते.(best home made body scrub for removing tanning and dead skin)
तिने सांगितलेल्या घरगुती उपायांपैकी एक उपाय bhubotanicals या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून यामध्ये तिने त्वचेचं टॅनिंग, डेड स्किन काढून टाकण्यासाठी एक घरगुती उपाय सुचवला आहे.
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये थोडं बेसन घ्या.
त्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडं कच्चं दूध टाका.
त्याचप्रमाणे त्यात चमचाभर दही घाला. तुमच्याकडे दही नसल्यास प्लेन योगर्ट घातलं तरी चालेल.
आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये थोडा मध टाका. थंडीच्या दिवसांत हा बॉडी स्क्रब वापरणार असाल तर मध आवर्जून घाला. कारण मध तुमच्या त्वचेला हायड्रेटेड ठेवतो.
आता हा लेप तुमच्या त्वचेला लावा आणि थोडा सुकत आला की हळुवारपणे चोळून काढून टाका. त्यानंतर पाण्याने त्वचा धुूवून घ्या. तुम्हाला त्वचा उजळ आणि मुलायम झालेली जाणवेल.