स्किन सीरम खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, त्वचेच्या पॅटर्ननुसार निवडा सीरम By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2022 6:43 PM 1 / 9विशिष्ट वयानंतर महिलांमध्ये अनेक बदल घडत असतात. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर देखील बरेच पिंपल्स, डार्क स्पॉट, एक्ने, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, एजिंग, ओपन पोर्स, अश्या अनेक समस्या चेहऱ्यावर उद्भवतात. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी बरेच जण ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. कोणा कोणाला हे प्रोडक्ट्स सूट करतात तर कोणा कोणाच्या चेहऱ्यावर त्या प्रोडक्ट्सचे साईड इफेक्ट्स दिसून येतात. 2 / 9सीरम त्वचेसाठी खूप चांगले असतात. ते त्वचेत खोलवर जाऊन काम करते. जर तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या असतील तर तुम्ही टोनिंगनंतर सीरम वापरावे. स्किन सीरमचा नियमित वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत करते. परंतु, त्वचेवर कोणतेही सीरम वापरण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.3 / 9त्वचेचा प्रकार जाणून घेतल्याशिवाय स्किन सीरम कधीही वापरू नका. जर त्वचा तेलकट असेल तर तेलकट त्वचेसाठी अनुकूल सीरम वापरावे. त्याच वेळी, जर त्वचा कोरडी असेल तर कोरड्या त्वचेसाठी अनुकूल सीरम वापरावे. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील असलेली समस्या कमी होईल. आणि चेहरा टवटवीत दिसेल.4 / 9आपल्या त्वचेसंबंधित तुम्हाला योग्य माहिती असल्यास, तुम्ही त्यानुसार सीरम निवडू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला खुल्या छिद्रांमध्ये समस्या असल्यास, या समस्येवर कार्य करणारे सीरम निवडा.5 / 9सीरम निवडताना तुम्ही तुमच्या वयाचीही काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, वाढत्या वयानुसार त्वचेच्या अनेक समस्याही वाढतात, त्यामुळे अँटी-एजिंग सिरमचा वापर करावा. त्याच वेळी, अँटी पिंपल सीरम तरुण वयासाठी चांगले असतात.6 / 9चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गुणधर्मांसह सीरम वापरू शकता. फ्रिकल्स, टॅनिंग आणि फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यासाठी आपण या सीरमला तुमच्या स्किन केअर रूटीनचा एक भाग बनवू शकता.7 / 9सीरममध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जात असली तरी काही रसायने अशी आहेत, ज्याचा दीर्घकाळ वापर केल्याने तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कोणतेही हॉर्स केमिकल्स असलेले सीरम खरेदी करू नका.8 / 9निस्तेज त्वचा दुरुस्त करण्यासाठी आपण हयालूरोनिक ऍसिडचा वापर करू शकता. याशिवाय तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे छिद्रांमध्ये लपलेली घाण सहज निघून जाते. आणि तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळते.9 / 9अनेक जणांच्या चेहऱ्यावर अकाली वृद्धत्वाच्या लक्षणांचा सामना करावा लागतो, जसे की त्त्वचेवर सुरकुत्या पडणे यामुळे वयाच्या आधीच चेहऱ्यामुळे काही जण वयस्कर दिसू लागतात. यासाठी आपण आपल्या नित्यक्रमात रेटिनॉल फेस सीरमचा समाविष्ट करू शकतात. त्याचा परिणाम काही दिवसातच चेहऱ्यावर दिसून येतो. आणि चेहरा चमकदार दिसू लागतो. आणखी वाचा Subscribe to Notifications