Join us   

'साडी विथ जॅकेट', नवा स्टायलिश ट्रेण्ड! यंदा लग्नसराईत दिसा स्पेशल, निवडा आपल्या साडीवर खास जॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2022 2:08 PM

1 / 10
१. नेहमी त्याच त्या टिपिकल पद्धतीने साडी नेसण्यापेक्षा यंदा लग्नसराईमध्ये तुम्ही साडी विथ जॅकेट असा स्टायलिश लूक करू शकता.
2 / 10
२. मागील एक- दोन वर्षांपासून जॅकेटवाल्या साडीचा ट्रेण्ड इन आहे. शिवाय या पद्धतीच्या साड्यांची आणखी एक खासियत म्हणजे दिवाळीनंतरच्या लग्नसराईमध्येच ही फॅशन जास्त केली जाते.
3 / 10
३. यामागचं मुख्य कारण म्हणजे दिवाळीनंतर येणारी थंडी. अशा पद्धतीचं जॅकेट साडीवर घातल्याने हमखास स्टायलिश लूक मिळतो, हे तर आहेच. पण या दिवसांत असणाऱ्या थंडीपासून संरक्षण म्हणूनही 'साडी विथ जॅकेट' घेण्याकडे अनेकींचा कल असतो.
4 / 10
४. माधुरी दिक्षितने जसं घातलं आहे, तशा शॉर्ट जॅकेटपासून ते लाँग जॅकेटपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट उपलब्ध आहेत.
5 / 10
५. कतरिना कैफचं हे लाँग जॅकेट अतिशय भरजरी आहे. तुमच्याकडे असणाऱ्या साडीनुसार मॅचिंग कपडा घेऊनही तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे जॅकेट शिवून घेऊ शकता.
6 / 10
६. सोनम कपूरचं जाळीदार जॅकेटही अतिशय आकर्षक लूक देणारं आहे. यामध्ये साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट जॅकेट घेतलं तर ते अधिक उठून दिसू शकतं.
7 / 10
७. एखाद्या फॉर्मल पार्टीसाठी साडी नेसणार असाल तर शिल्पा शेट्टीप्रमाणे असं सिंपल, सोबर जॅकेट निवडू शकता.
8 / 10
८. फॉर्मल साडीवर घालता येईल, अशा फॉर्मल जॅकेटचा हा आणखी एक प्रकार. एखाद्या ऑफिस पार्टीसाठी किंवा ऑफिस मिटिंगसाठी हा लूक छान दिसू शकतो.
9 / 10
९. फॉर्मल लूक प्रकारात मोडणारं हे आणखी एक जॅकेट. असं एकच जॅकेट तुम्ही वेगवेगळ्या साड्यांवरही ट्राय करू शकता. कॉटन किंवा प्लेन सिल्क साड्यांवर हे जॅकेट छान दिसेल.
10 / 10
१०. एखाद्या पार्टीसाठी किंवा रिसेप्शनसाठी अगदी स्टायलिश लूक करायचा असेल, तर करिश्मा कपूरचा हा लूक ट्राय करू शकता.
टॅग्स : ब्यूटी टिप्सलग्नफॅशन