डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमीच होत नाहीत? ८ घरगुती उपाय, हमखास त्रास कमी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 1:24 PM 1 / 9सध्या लोकांमध्ये डार्क सर्कलची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही पाहण्याची स्क्रीन टायमिंग वाढली आहे. त्यामुळे मुलांमध्ये कमी वयात चष्मा लागणे. डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होणे अशी समस्या उद्भवत आहे. याला मुख्य कारणीभूत बिघडलेली जीवनशैली देखील असू शकते. वेळेवर अन्न न खाणे, डोळ्यांची निगा न राखणे यामुळे डोळे कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. काळे वर्तुळे घालवण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. मात्र, त्याचा वापर न करता आपण घरगुती उपायांचा वापर करून डार्क सर्कलपासून सुटका मिळवू शकता. 2 / 9व्हिटामिन ई स्कीनसाठी खूप प्रभावी आहे. डार्क सर्कलपासून सुटका मिळवण्यासाठी आपण व्हिटामिन ई चा वापर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी व्हिटामिन ई चे काही थेंब डोळ्यांखाली लावा. आणि चांगले मसाज करा. शेवटी सकाळी थंड पाण्याने धुवून घ्या. उत्तम रिझल्टसाठी ही प्रक्रिया आठवड्यातून २ वेळा करा.3 / 9गुलाबजल डोळ्यांसाठी आणि चेहऱ्यासाठी खूप प्रभावी आहे. एका क्लिंजरप्रमाणे ते काम करते. कॉटन पॅडवर दोन थेंब गुलाबजल घ्या. डोळ्यांखाली अलगद हाताने मसाज करा. नंतर धुवून घ्या. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून २ वेळा वापरा.4 / 9चेहऱ्यासाठी आपण केसरचा वापर करतो. त्याने स्कीन खूप ग्लो करते. केसरमध्ये एंटी ऑक्सीडेंट आणि एंटी इंफ्लामेंट्री गुण आढळून येते. जे काळे डाग दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. दोन चमचे दुधात ३ ते ४ धागे केसर मिसळा. आणि डोळ्यांना चांगले मसाज करा. अशाने काळे डाग दूर होतील यासह ग्लो येईल.5 / 9टोमॅटो काळे वर्तुळे घालवण्यासाठी खूप मदतगार आहे. सर्वप्रथम लिंबूचा रस टोमॅटोच्या रसामध्ये मिसळा. आणि रस कॉटन बॉलच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. अशाने डार्क सर्कलपासून सुटका मिळेल. डोळ्यांना देखील आराम मिळेल.6 / 9काळे वर्तुळे घालवण्यासाठी कोल्ड टी बॅग प्रभावी ठरेल. ग्रीन टी बॅग पहिले पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. शेवटी डोळ्यांवर ही बॅग १० मिनिटे ठेवा. अशाने डोळ्यांना आराम मिळेल. 7 / 9डार्क सर्कलपासून सुटका हवी असेल तर नियमित बर्फाचा वापर करा. दररोज १० मिनिटे बर्फाने डोळ्यांना मसाज करा. असे केल्याने डोळे चमकदार दिसतील आणि डोळ्यांना आराम मिळेल. 8 / 9दुध आणि गुलाबजलचं मिश्रण आपल्या चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे. दुध आणि गुलाबजल मिसळून कॉटन बॉलच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. असे केल्याने लवकर रिझल्ट दिसेल. 9 / 9संत्र्याचा रस आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण काम करतात. त्यातील व्हिटामिन ए आणि सी डोळ्यांना नवी उर्जा देतात. ताज्या संत्र्याच्या रसात ग्लिसरीनचे काही थेंब टाका, कॉटन पॅडच्या मदतीने डोळ्यांवर 10 मिनिटे मसाज करा. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून हि प्रक्रिया २ वेळा करा. आणखी वाचा Subscribe to Notifications