'या' एका ग्लासमध्ये लपलं आहे दीपिका पादुकोणच्या सौंदर्याचं रहस्य, तिच्या डाएटीशियन सांगतात.....
Updated:March 29, 2025 16:34 IST2025-03-29T09:14:53+5:302025-03-29T16:34:23+5:30

दीपिका पादुकोणचं सौंदर्य आपल्याला तिच्या प्रत्येक चित्रपटामधूनच दिसून येतं. अभिनेत्री असल्याने ती सौंदर्य जपण्यासाठी महागडे कॉस्मेटिक्स वापरत असणार यात काही वाद नाहीच..
पण तरीही ती आतून स्वत:चं आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचेचं तारुण्य, सौंदर्य जपण्यासाठी काही गोष्टी आवर्जून करते अशी माहिती तिच्या आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
श्वेता शाह यांनी जी पोस्ट शेअर केली आहे त्यानुसार दीपिका रोज एक खास ज्यूस पिते आणि त्यामुळेच तिची त्वचा जास्त सुंदर, चमकदार, तेजस्वी दिसते.
यासाठी दीपिका दररोज सकाळी बीटचा ज्यूस घेते. पण त्यामध्ये आणखीही काही पदार्थ असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मुठभर कोथिंबीर..
हा ज्यूस करण्यासाठी बीटरुट लहान आकाराचे घेऊन त्याचे काप करा. त्यासोबतच कोथिंबीरही चिरून घ्या. यामध्येच आता ७ ते ८ कडुलिंबाची पाने आणि १० ते १२ कढीपत्त्याची पाने घाला. हे सगळे पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या आणि नंतर ते गाळून घ्या.
आता या रसामध्ये आणखी थोडं पाणी घालून ते प्यावं. दीपिकाने हा उपाय जवळपास ३ महिने सलग केला होता असं तिच्या आहारतज्ज्ञ सांगतात.