Shiv Jayanti 2025: मिरवणुकीसाठी पारंपरिक मराठमोळी वेशभुषा करायची आहे? त्यासाठीच खास ५ टिप्स..

Updated:February 17, 2025 18:57 IST2025-02-17T18:06:57+5:302025-02-17T18:57:40+5:30

Shiv Jayanti 2025 Traditional Look Ideas: शिवजयंतीचा उत्सव १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सगळीकडे तयारी सुरू झाली असून अनेक शहरांमध्ये भव्य मिरवणूक काढल्या जातात.

Shiv Jayanti 2025: मिरवणुकीसाठी पारंपरिक मराठमोळी वेशभुषा करायची आहे? त्यासाठीच खास ५ टिप्स..

शिवजयंतीचा उत्सव १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सगळीकडे तयारी सुरू झाली असून अनेक शहरांमध्ये भव्य मिरवणूक काढल्या जातात. या मिरवणुकीमध्ये सहभागी होताना छान पारंपरिक वेशभुषा करा.. कार्यक्रमात आणखी रंगत येईल..(Shiv Jayanti Utsav 2025)

Shiv Jayanti 2025: मिरवणुकीसाठी पारंपरिक मराठमोळी वेशभुषा करायची आहे? त्यासाठीच खास ५ टिप्स..

नऊवारी साडी, अंगावर शेला, नाकात नथ, चंद्रकोर अशी सगळी अस्सल मराठमोळी वेशभुषा करूनही तुम्ही मिरवणुकीत सहभागी होऊ शकता..

Shiv Jayanti 2025: मिरवणुकीसाठी पारंपरिक मराठमोळी वेशभुषा करायची आहे? त्यासाठीच खास ५ टिप्स..

तयार होण्यासाठी खूप वेळ नसेल तर पांढरा कुर्ता- पायजमा आणि त्यावर केशरी जॅकेट घाला. त्याच्या जोडीला मात्र कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ हवीच..

Shiv Jayanti 2025: मिरवणुकीसाठी पारंपरिक मराठमोळी वेशभुषा करायची आहे? त्यासाठीच खास ५ टिप्स..

कुर्ता- पायजमा आणि जॅकेट अशी वेशभुषा करणार असाल तर त्यावर अशा पद्धतीचा डौलदार फेटा जरूर बांधा. तुमचा लूक एकदम खास होईल.

Shiv Jayanti 2025: मिरवणुकीसाठी पारंपरिक मराठमोळी वेशभुषा करायची आहे? त्यासाठीच खास ५ टिप्स..

नऊवारी साडी नेसायला वेळ नसेल तर नेहमीची सहावार साडी आणि त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज असंही करू शकता. कमीतकमी वेळेत तयार होण्यासाठी असा लूक चांगला आहे.

Shiv Jayanti 2025: मिरवणुकीसाठी पारंपरिक मराठमोळी वेशभुषा करायची आहे? त्यासाठीच खास ५ टिप्स..

साडी, पंजाबी ड्रेस किंवा कुर्ता- पायजमा कोणत्याही पद्धतीचा असला तरी डोक्यावर जेव्हा तुम्ही केशरी फेटा चढवता तेव्हा आपोआपच तुम्ही मराठमोळे दिसू लागता.