1 / 6हिवाळ्यात त्वचा खूपच कोरडी पडते, काळवंडून जाते (skin care tips for winter). त्यामुळे या दिवसांत त्वचेची थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे2 / 6त्यासाठी काय करावं, याविषयीचा एक सोपा उपाय rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे चेहऱ्यावर एक छानसा ग्लो पाहिजे असेल, त्वचेचे सौंदर्य खुलवायचे असेल तर हा उपाय लगेचच करून पाहा.3 / 6हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी चेहऱ्यावर थोडं गुलाबजल लावा. त्यानंतर हातावर ॲलोव्हेरा जेल घ्या. किंवा कोरफडीचा ताजा गर काढून घेतला तरी चालेल.4 / 6ॲलोव्हेरा जेल घेऊन चेहऱ्यावर ५ ते ७ मिनिटांसाठी गोलाकार दिशेने हळूवार मसाज करा. यानंतर चेहरा धुवून टाका आणि चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा. 5 / 6रात्री झोपण्यापुर्वी सलग ७ दिवस हा उपाय केल्यास चेहऱ्यावर खुप छान परिणाम दिसून येईल. 6 / 6जर तुमची त्वचा कोरडी असेल तर ॲलोव्हेरा जेलमध्ये थोडं बदाम तेल टाकून चेहऱ्याला लावावे.