5 Natural Sunscreen: त्वचा टॅन होणं टाळणारे ५ पदार्थ, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजांच्या समर स्पेशल ब्यूटी टिप्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2022 7:42 PM 1 / 10१. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.. अशा भर उन्हात ज्यांना घराबाहेर पडावं लागतं.. त्यांना उन्हापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावीच लागते.2 / 10२. चेहरा कितीही झाकून घेतला तरीही या दिवसांत टॅनिंग होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं.3 / 10३. टॅनिंग होऊ नये आणि उन्हापासून त्वचेचं संरक्षण व्हावं, यासाठी सनस्क्रिन लावणं तर गरजेचं आहेच. 4 / 10४. पण नुसतंच सनस्क्रिन लावून उपयोग नाही. त्यासाठी तुम्ही आहारात काही बदल केला पाहिजे. काही फळं आणि भाज्या उन्हाळ्यात आवर्जून खाल्ल्या पाहिजेत, असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा यांनी दिला आहे.5 / 10५. उन्हाळ्यात त्वचेचं टॅनिंग होऊ द्यायचं नसेल तर सनस्क्रिन लावाच, पण काही फळदेखील खा, असं त्या सांगत आहे. नॅचरल सनस्क्रिन इफेक्ट देणारी आणि टॅनिंग रोखणारी कोणती फळ खावीत, याविषयीचा एक व्हिडिओ त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. 6 / 10६. उन्हापासून संरक्षण देणारं आणि टॅनिंग होऊ न देणारं एक फळ म्हणजे डाळिंब. डाळिंबामधे असणारे एलॅजिक ॲसिड आणि ॲण्टीऑक्सिडंट्स युव्ही ए आणि युव्ही बी किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतात आणि टॅन होण्यापासून बऱ्याच प्रमाणात रोखतात.7 / 10७. प्रखर सुर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी द्राक्षदेखील खूप उपयोगी ठरतात. जवळपास प्रत्येक सनस्क्रिन लोशनमध्ये द्राक्षाच्या रसाचा अंश वापरण्यात येतो. कारण ते त्वचेसाठी अतिशय पोषक असतात. त्यामुळेच उन्हाळ्यात द्राक्ष खायला विसरू नका.8 / 10८. त्वचेसाठी पोषक ठरणारे कॅरेटोनॉईड्स रताळ्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे उन्हाळ्यात रताळे खायला विसरू नका, असंही पुजा माखिजा सांगत आहेत.9 / 10९. टॅनिंग होऊ द्यायचं नसेल तर दररोज एक मध्यम आकाराचं गाजर खाणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.10 / 10 १०. यासोबतच सायट्रस फ्रुट्स म्हणजे संत्री, मोसंबी, किवी अशी लिंबूवर्गीय फळं देखील उन्हाळ्यात खायला पाहिजेत. कारण व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळविण्याचा तो एक उत्तम उपाय आहे. या फळांमुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येणे कमी होते, पिगमेंटेशन थांबते आणि त्वचा अधिकाधिक चमकदार, नितळ, स्वच्छ होते. आणखी वाचा Subscribe to Notifications