1 / 7१. हिवाळ्यात सगळ्यात जास्त त्रास होतो तो त्वचेला. त्वचेचा पोत या दिवसांत एवढा जास्त खराब होतो की त्यामुळे त्वचा कोरडी पडून निस्तेज दिसू लागते. 2 / 7२. अशा कोरड्या त्वचेला मग वारंवार मॉईश्चरायझर लावावे लागते. तरीही त्वचा कोरडी दिसतेच. म्हणूनच काेरड्या त्वचेसाठी असे बाह्य उपचार करण्यापेक्षा आहारात काही बदल करा. किंवा चेहऱ्याला काही पदार्थ लावा. जेणेकरून त्वचा हिवाळ्यातही कोरडी पडणार नाही. शिवाय कायम ग्लाेईंग दिसेल.3 / 7३. हिवाळ्यात थंडी असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. पाणी कमी प्यायल्या गेलं की डिहायड्रेशन होतं आणि त्वचेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या दिवसांत पाणी पिण्याचं प्रमाण मुळीच कमी होऊ देऊ नका. हवं तर सकाळी आणि रात्री कोमट पाणी प्या.4 / 7३. हिवाळ्याच्या दिवसांत आवर्जून साजूक तूप खा. दररोज एक चमचा तरी तूप पोटात गेलंच पाहिजे. तुपामध्ये असणारं व्हिटॅमिन ई त्वचेसाठी अतिशय पोषक असतं. शिवाय रोज रात्री झोपताना ४ ते ५ थेंब तूप हातावर घ्या आणि त्याने चेहऱ्याला मसाज करा. त्वचा चमकदार होईल..5 / 7४. या दिवसांत संत्री भरपूर प्रमाणात मिळतात. त्वचेसाठी ती अतिशय उपयुक्त आहेत. रोज एक संत्र खा. त्वचा चमकदार तर होईलच पण पिंपल्स, त्वचेवरचे डाग कमी होण्यासही मदत होईल.6 / 7५. दह्यामध्ये असणारं लॅक्टिक ॲसिड त्वचेसाठी नॅचरल मॉईश्चरायझर म्हणून काम करतं. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा त्वचेला दह्याने मसाज करा. साधारण १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. दह्यामध्ये लिंबू पिळून लावल्यास टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. 7 / 7६. त्वचेसाठी मधदेखील अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. त्याच्यामध्ये नॅचरल ब्लिचिंग आणि माॅईश्चरायजिंग घटक असतात. मध आणि साय हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला मसाज करा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेचा पोत मऊ होईल.